Thursday, October 22, 2026
Homeब्रेकिंग न्यूजलोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा जन्मदिवस 'लेखन प्रेरणा दिन' म्हणून साजरा करण्याचा...

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा जन्मदिवस ‘लेखन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

- Advertisement -

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा १ ऑगस्ट हा जन्मदिवस ‘लेखन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने बुधवारी यासंदर्भातील शासन परिपत्रक जारी केले.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यिक योगदानाचे स्मरण म्हणून राज्यातील सर्व विद्यापीठे, महाविद्यालये आणि संस्थांमध्ये १ ऑगस्ट हा दिवस लेखन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जाईल. यानिमित्ताने विद्यार्थ्यांसाठी कविता, कथा, निबंध लेखन स्पर्धांचे आयोजन करण्यात येईल.

याशिवाय विविध विषयांवर वक्तृत्व तसेच वादविवाद स्पर्धा, स्थानिक साहित्यिकांच्या मुलाखती, व्याख्याने, ग्रथदिंडीसोबतच अण्णा भाऊंच्या कथा, कादंबऱ्या, प्रवास वर्णन, लोकनाट्य तसेच शाहिरीचे विद्यार्थ्यांनी वाचन करणे यासोबतच त्यांच्या व्यक्तित्व आणि साहित्यिक कर्तृत्वावर व्याख्यांनांचे आयोजन करण्याच्या परिपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत. तसेच अण्णा भाऊंच्या साहित्यावर चर्चासत्रे, परिसंवाद, कार्यशाळा आणि साहित्य संमेलनांचे आयोजन करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

ताज्या बातम्या

संपादकीय : २२ ऑक्टोबर २०२६ – रेजिम चेंजचा राजकीय गलबला

0
दसरा मेळावा हा महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीतील केवळ शक्तिप्रदर्शनाचा सोहळा नाही, तर आगामी राजकारणाची दिशा सूचित करणारा व्यासपीठावरील विचारसंघर्षही ठरत चालल्याचे गेल्या काही वर्षांपासून दिसू...