Thursday, September 19, 2024
HomeनाशिकNashik Ganeshotsav 2024 : वाहतुकीचे नियम पाळा, अपघात टाळा; शिंपी परिवाराने साकारला...

Nashik Ganeshotsav 2024 : वाहतुकीचे नियम पाळा, अपघात टाळा; शिंपी परिवाराने साकारला आकर्षक देखावा

नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik

- Advertisement -

येथील विस्टा फेज २ सोसायटीतील राहुल शिंपी, प्रिया शिंपी, संध्या शिंपी, सत्यजित शिंपी व संपूर्ण शिंपी परिवाराने अथक परिश्रम करून गणपती (Ganpati) समोर पर्यावरणपूरक वाहतूक नियमांबद्दलचा आरास देखावा (Appearance) साकारला आहे.

हे देखील वाचा : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सपत्नीक घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन

दिवसेंदिवस वाहनांची (Vehicles) संख्या वाढत असल्यामुळे रस्ता सुरक्षा हे एक मोठे आव्हान बनले आहे. अपघात आणि वाहतूक कोंडी (Accidents and traffic Jams) हे मुख्यतः शिस्तीचा अभाव आणि वाहतूक नियमांबद्दलचे अज्ञानामुळे निर्माण होतात. कर्णकर्कश्य हॉर्न, सायलेन्सर वाहनांचे आवाज, वेगाने वाहन चालवणे आणि त्यामुळे होणारे अपघात, याचे मुख्य कारण म्हणजे वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणे जो देखेगा, वही सीखेगा. म्हणूनच बालवयात मुलांना वाहतुकीबाबत माहिती दिल्यास चांगले नागरिक घडवू शकतो.

हे देखील वाचा : Nashik Crime News : १३ तडीपार गजाआड; चार विशेष पथकांची कारवाई

भावी पिढीमध्ये रहदारी व वाहतुकीच्या नियमांकडे पाहण्याचा दृष्टिकोनात बदल घडवून आणण्यासाठी,बालकांमध्ये वाहतूक नियम पाळण्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि रस्ता सुरक्षा चिन्हांची मिळवण्यासाठी वाहतुकीचे नियम पाळा, अपघात टाळा सदराखाली देखावा साकारला आहे. आरास ही पर्यावरणपूरक आहे. ज्यात कागदी पृष्ठे, आइस्क्रीमच्या काड्या, ओढण्या, कागदी इत्यादींचा वापर केला आहे. वाहतूक नियम पाळून आणि हेल्मेट परिधान करून बाप्पा दुचाकीवरून स्वार होत आहेत, अशी श्रींची मूर्ती साकारण्यात आली आहे. विविध रस्ते माहिती फलक, त्यांचे प्रकार या आरसात दाखवले आहेत.

हे देखील वाचा : गणेशोत्सवाला गालबोट! मंडपावर दडगफेक, गाड्यांची तोडफोड-जाळपोळ

त्याबरोबरच मद्यपान (Drinking) करून वाहन चालवू नये, याबाबत जनजागृती करण्यासाठी मद्य बाटलीची प्रतिकृती दाखवून त्यातून मद्यरुपी पाणी पडताना दाखवले आहे. तसेच वेगावर नियंत्रण ठेवावे, यासाठी स्पीडो मीटरची प्रतिकृतीही बनविण्यात आली आहे. बालगोपाळांना वाहन चालवण्याचा अनुभव मिळावा, यासाठी बसची प्रतिकृती तयार केली आहे, ज्यात बसून सेल्फी काढू शकतात. ही आरास साकारण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागला. यासाठी संपूर्ण शिंपी परिवाराने परिश्रम करून देखावा सादर केला आहे. दरवर्षी साकारलेल्या देखाव्यास नाशिक जिल्हास्तरावर (Nashik District) विविध बक्षीसे पटकावली आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या