Friday, May 3, 2024
Homeनाशिकआयमाचे माजी अध्यक्ष बाबुराव सोनार यांचे निधन

आयमाचे माजी अध्यक्ष बाबुराव सोनार यांचे निधन

सातपूर l Satpur

आयमाचे माजी अध्यक्ष व महात्मा नगर ज्येष्ठ नागरिक संघटनेचे माजी अध्यक्ष बाबुराव सोनार यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

- Advertisement -

आयमाच्या स्थापनेत बाबुराव सोनार यांनी मोलाचे योगदान दिले आले होते. महात्मा नगर येथील गणेश मंदिरात ज्येष्ठ नागरिक संघटनेची स्थापना करून विविध उपक्रमांच्या माध्यमातून उत्कृष्ट आदर्श निर्माण केला.

गणपती मंदिरात दिवाळी पाडवा पहाट हा उपक्रम बाबुराव सोनारे यांच्या प्रयत्नातुन साकारला आहे. निवेक क्लब मधील टेबल टेनिस खेळात त्यांचा विशेष हातखंडा होता. आयमा व निवेक संघटनेचे माजी अध्यक्ष संदीप सोनार यांचे ते वडील होत.

- Advertisment -

ताज्या बातम्या