Thursday, May 2, 2024
HomeनाशिकNashik News : भावी खासदार म्हणून अरिंगळे यांचे झळकले बॅनर्स

Nashik News : भावी खासदार म्हणून अरिंगळे यांचे झळकले बॅनर्स

नाशिकरोड | दिगंबर शहाणे | Nashikroad

नाशिकचे भावी खासदार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) जिल्हा नेते तसेच नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेचे चेअरमन निवृत्ती अरिंगळे (Nivrutti Aringale) यांचे नाशिक शहरात विविध ठिकाणी भावी खासदार म्हणून बॅनर मोठ्या प्रमाणात झळकल्या असून या बॅनरमुळे सर्वच राजकीय पक्षात व नागरिकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे….

- Advertisement -

लोकसभा निवडणूक होण्यास किमान सहा ते आठ महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. मात्र लोकसभा निवडणुकीची तयारी आतापासूनच विविध राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. सध्या नाशिक शहराचे खासदार म्हणून गेल्या नऊ वर्षापासून हेमंत गोडसे हे आहे. खासदार गोडसे हे शिवसेना भाजप युतीच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यानंतर साडेतीन वर्षांपूर्वी राज्यात सत्तांतर झाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपची साथ सोडली व महाविकास आघाडीच्या माध्यमातून ते राज्याचे मुख्यमंत्री बनले.

त्यामुळे शिवसेना व भाजपची युती संपुष्टात आली होती. दरम्यान गेल्यावर्षी राज्यसभा व विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात झटका बसला व भाजपाचे राज्यसभेचे व विधान परिषदेचे उमेदवार बहुमत नसताना सुद्धा निवडून आले होते. त्यामुळे महाविकास आघाडीतील मते फुटली.

Cricket Viral News : गोलंदाजाने एका चेंडूत दिल्या तब्बल १८ धावा; टी-२० क्रिकेटमधील सर्वात महागडा चेंडू, पाहा Video

परिणामी गेल्यावर्षी वीस जून नंतर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सुमारे 40 आमदार व 13 खासदार यांनी मूळ शिवसेनेची साथ सोडली व भाजपासोबत युती केली. त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले व महाविकास आघाडीचे सरकार कोसळले राज्यात मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे शिवसेना भाजप युतीचे सरकार स्थापन झाले.

दरम्यान शिवसेनेतील १३ खासदार वेगळे झाले व त्यांनी एकनाथ शिंदेंची साथ धरली. परिणामी आता सर्वच राजकीय पक्षांमध्ये लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे. त्यामध्ये प्रामुख्याने भारतीय जनता पार्टी, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडी व इतर पक्ष लोकसभा निवडणुकीच्या तयारीत आहे.

मात्र नाशिक शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा नेते व नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेचे चेअरमन निवृत्ती अरिंगळे यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याची जोरदार तयारी केल्याचे चित्र आहे.

युतीमधील तणाव वाढला? अनिल बोंडेंच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर शिंदे गटाचे आमदार भडकले

त्यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी नांदूर नाका, नाशिक शहर, भगूर, नाशिक रोड, सिन्नर फाटा, जेलरोड आदी भागात भावी खासदार असे बॅनर लावले आहे. हे बॅनर नाशिककरांचे व राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या व कार्यकर्त्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

2019 मध्ये झालेल्या निवडणुकीतसुद्धा निवृत्ती अरिंगळे हे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे लोकसभा निवडणुकीत इच्छुक उमेदवार होते. मात्र त्यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्यात आली होती. परंतु आता नाशिक लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावी व अरिंगळे यांना उमेदवारी द्यावी, अशी त्यांच्या समर्थकांची मागणी आहे.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी कायम राहणार आहे. मात्र नाशिक लोकसभेच्या जागेवर ठाकरे गट दावा करू शकतो. त्यामुळे जागा कोणाला मिळणार किंवा उमेदवारी कोणाला देणार हे फक्त महाविकास आघाडीचे नेतेच ठरवू शकतात.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

“कोणाची नक्कल काढून काही होणार नाही तर…”; राज ठाकरेंना शुभेच्छा देताना आव्हाडांचा टोमणा

- Advertisment -

ताज्या बातम्या