शिरवाडे वाकद | वार्ताहर | Shirwade Wakad
शुक्रवार (दि.२० डिसेंबर) रोजी चासनळी येथील गोदावरी नदीपात्रात (Godavari River Basin) एक गाठोड्यात बांधलेल्या अवस्थेत बालकाचा मृतदेह (Dead Body) आढळून आला होता. धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. या घटनेमुळे तपासाचे एक मोठे आव्हान कोपरगाव तालुका पोलिसांसमोर होते.
कोपरगाव (Kopargaon) ग्रामीण पो.नि.संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी (Police) अथक परिश्रम घेऊन चिमुकल्याची ओळख पटवली असून त्याच्या नातेवाईकांचा शोध लागला आहे. कार्तिक ज्ञानेश्वर बदादे (वय ४ वर्ष) असे मयत चिमुकल्याचे नाव असून तो साकोरे मिग ता. निफाड जि.नाशिक येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. कार्तिकचा मृतदेह त्याच्या वडिलांच्या ताब्यात देण्यात आला आहे. मयत कार्तिक बालवाडीत शिक्षण (Education) घेत होता, तसेच तो हुशारही होता.
दरम्यान, कार्तिक हा गेल्या दोन महिन्यापासून त्याच्या आईसोबत (Mother) राहत असल्याची माहिती त्याच्या वडिलांनी दिली. मात्र, कार्तिकचा मृतदेह नदीत कसा आला? नेमका कोणी गाठोड्यात बांधून मृतदेह नदीत आणून टाकला? कार्तिक आईसोबत राहत असल्याने संशयाची सुई त्याच्या आईभोवती फिरत असल्याने पोलीस तपासात नेमकं काय निष्पन्न होते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर आरोपीला लवकरच अटक होण्याची शक्यता आहे, अशी माहिती पोनि संदीप कोळी यांनी दिली.