Tuesday, January 6, 2026
HomeनाशिकNashik News : कादवा कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन शुभारंभ उत्साहात

Nashik News : कादवा कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन शुभारंभ उत्साहात

दिंडोरी | प्रतिनिधी | Dindori

कादवाने (Kadwa) यंदा ऊस (Sugar Cane) तोडीचे योग्य नियोजन केले असून यंदा सुमारे साडे चार ते पाच लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. तसेच या हंगामात पूर्ण क्षमतेने इथेनॉल निर्मिती केली जाणार आहे असे प्रतिपादन कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे (Sriram Shete) यांनी विजया दशमीच्या शुभमुहुर्तावर कारखान्याच्या ४८ व्या बॉयलर अग्निप्रदीपन समारंभावेळी केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून खासदार भास्कर भगरे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik News : ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी नाशिकहून शिवसैनिक मुंबईकडे रवाना

YouTube video player

पुढे बोलताना श्रीराम शेटे म्हणाले की, साखर उद्योग (Sugar Industry) अनेक अडचणीतून मार्गक्रमण करत असताना कादवा साखर कारखान्याने प्रतिकूल परिस्थितीतही प्रगतीकडे वाटचाल सुरू ठेवली आहे. ऊस हे शाश्वत पीक असून, सर्व शेतकरी सभासदांनी जास्तीत जास्त ऊसलागवड करावी असे आवाहन केले. यावेळी बोलताना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांनी कारखान्याची प्रगतीकडे वाटचाल सुरू असून त्यादृष्टीने आपण ही कारखान्यास सर्वोतोपरी सहकार्य करत असून शेतकऱ्यांना वीज पाणी रस्ते आदी देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. खासदार भास्कर भगरे (MP Bhaskar Bhagare) यांनी कादवाच्या भरभराटीसाठी सर्वांनी जास्तीत जास्त ऊस लागवड करत कारखान्याला ऊस पुरवठा करावा असे आवाहन केले. यावेळी युनियन अध्यक्ष भगवान जाधव यांनी हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्व कामगार प्रयत्नशील राहतील असे सांगितले.

हे देखील वाचा : Nashik Crime News : आयबीचे पथक नाशकात; अबू सालेमच्या मैत्रिणीसह ॲस्ट्रोलॉजर एटीएसच्या ताब्यात

दरम्यान, बॉयलर अग्निप्रदीपण शुभारंभ सभासद नवनाथ बाबुराव लोखंडे,लोखंडेवाडी,माधव सिताराम कड जोरण, विलास दादाजी जाधव – करंजवण, संजय माधव भालेराव – तिसगाव,नामदेव कारभारी पगार – वाघदर्डी यांच्या शुभहस्ते पार पडला. याप्रंसगी बाकेराव पाटील, गणपतराव पाटील, त्र्यंबकराव संधान, बाळासाहेब पाटील, अनिल दादा देशमुख, साहेबराव पाटील, विलास कड, सदुआप्पा शेळके, अशोक वाघ, चिंधु पाटील, युनियन अध्यक्ष भगवान जाधव, आदींसह सर्व संचालक मंडळ, सभासद, कामगार उपस्थित होते.यावेळी स्वागत संचालक शहाजी सोमवंशी यांनी केले तर संचालक सुखदेव जाधव यांनी आभार मानले. तसेच सूत्रसंचालन अशोक शिंदे यांनी केले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Nashik Crime : ‘त्या’ खुनामागे छेडछाड! तरुणाच्या हत्येनंतर जमावाची संशयिताच्या घरावर...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik पेठरोड परिसरातील (Peth Road Area) अश्वमेघ नगरात तरुणाची निघृण हत्या झाल्यानंतर या घटनेला रविवारी (दि. ४) भरदुपारी गंभीर वळण मिळाले....