Thursday, September 10, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik News : पंचवटीत श्रीराम जन्मोत्सवाचा जल्लोष; श्रीकाळाराम मंदिरात भाविकांची गर्दी

Nashik News : पंचवटीत श्रीराम जन्मोत्सवाचा जल्लोष; श्रीकाळाराम मंदिरात भाविकांची गर्दी

पंचवटी | प्रतिनिधी Panchavati

- Advertisement -

कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धास्थानी असलेल्या मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांचा जन्मोत्सव पंचवटी परिसरात आज अभूतपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला. श्री काळाराम मंदिरात दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. नियोजनबद्ध व्यवस्थेमुळे भाविकांना सुलभ दर्शन झाल्याची समाधानकारक प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.

‘सीयावर रामचंद्र की जय’ आणि ‘श्रीराम जय राम जय जय राम’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. पूर्व दरवाजाजवळ सुरू असलेल्या विकासकामांमुळे भाविकांसाठी उत्तर दरवाजातून प्रवेश व दक्षिण दरवाजातून निर्गमन अशी व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे रांगेचे योग्य नियोजन होऊन गर्दी असूनही दर्शन सुरळीत पार पडले.

उपायुक्त मोनिका राऊत यांच्या नेतृत्वाखाली तीन वरिष्ठ पोलिस निरीक्षकांसह मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दिवसभर कोणतीही अनुचित घटना न घडता भाविकांनी शांततेत व भक्तिभावाने दर्शन घेतले.

दुपारी बारा वाजता श्रीरामाच्या मूर्तीसमोरील पडदा उघडताच रामनामाचा जयघोष झाला. यावेळी झालेल्या महाआरतीस राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार सीमा हिरे, महापौर हिमगौरी आहेर-आडके, उपमहापौर विलास शिंदे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

संस्थानतर्फे सुमारे ५०० किलो पंजेरीचा प्रसाद वाटप करण्यात आला. याशिवाय भाविकांनी राजगिऱ्याचे लाडू, बुंदी, केळी, खडीसाखर आदींचेही वितरण केले. उन्हाच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी थंड पाण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली होती.

सकाळी अभिषेक व नित्यपूजनानंतर दया कुलकर्णी यांचे कीर्तन तसेच मनकामेश्वर भक्त मंडळाचा भजन कार्यक्रम झाला. भाविकांनी रामरक्षा पठण करत भक्तिमय वातावरण निर्माण केले. ढोल-ताशांच्या गजरात आणि रामनामाच्या घोषात संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.

ताज्या बातम्या

राज

“देशाच्या राजधानीचे महत्व संपवण्याचा प्रयत्न सुरु”; राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यावरुन राज...

0
मुंबई | Mumbaiराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार राजधानी दिल्लीतून गुजरातमध्ये हलवण्यावरून देशात नवा वाद सुरु झाला आहे. विरोधकांनी केंद्र सरकारच्या या निर्णयावरून धारेवर धरले आहे. शिवसेना...