Thursday, September 10, 2026
Homeब्रेकिंग न्यूजशिकारीच्या वेळेला जेवायची...अमृता फडणवीसांच्या निमंत्रणावर मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, दिलेला शब्द...

शिकारीच्या वेळेला जेवायची…अमृता फडणवीसांच्या निमंत्रणावर मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, दिलेला शब्द…

जालना | Jalana
राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून गदारोळ सुरु आहे. गुरुवारी (10 सप्टेंबर) मनोज जरांगे पाटलांचा उपोषणाचा तेरावा दिवस असून त्यांनी राज्य सरकारवर टीका करत मुंबईमध्ये मराठा आंदोलक येऊन धडकणार असल्याचा इशारा दिला आहे. आज पोळा असल्याने त्यांनी सणानिमित्त तमाम शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधतानाच अमृता फडणवीसांनी दिलेल्या निमंत्रणावर भाष्य केले.

भाऊ मैदानात असताना ताईने बोलवू नये
अंतरवाली सराटीमधून माध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “हे बघा ताईंनी सांगितले आहेना, मग जेवायला पण जाऊ ना. ताईंनी सांगितले ना पण भाऊबीजेच्या वेळी. आता आंदोलन सुरु आहे. आता बहिणीने या वेळी बोलवू नये. भाऊ मैदानात असताना बोलवू नये. भाऊ संकटात जातो. बहिणीने तेवढा तरी बारकाईने विचार करावा आमचा. आज मात्र जेवायला बोलवू नये. आमच्या बहिणींने आम्हाला भाऊबीजेला बोलवावे, साडी चोळी घेऊन जातो. दिलेला शब्द आहे मनोज जरांगेचा. फक्त आज लढायच्या मैदानातून तुम्ही जेवायला या म्हणाल तर हार पत्कारावी लागेल ताई. ताईने तो विचार आणि दृष्टीकोन आणि ती मायेची भावना आमच्या बाजूने ठेवावी. शिकारीच्या वेळेला जेवायची सवड नसते. आज त्यांचा हा भाऊ संकटात असून संपूर्ण समाजाचे भवितव्य पणाला लागले आहे; त्यामुळे बहिणीने मायेची भावना आंदोलनाच्या बाजूने ठेवावी,” असे जरांगे म्हणाले.

- Advertisement -

६ खासदारांच्या फुटीनंतर ठाकरे गटाचा मोठा निर्णय; ४० मतदारसंघांत नेत्यांवर मोठी जबाबदारी

मुंबईला जाणार हे निश्चित
जसे दिवस येतील तसा संघर्ष करावा लागतो.कुणबी प्रमाणपत्रांची शिबीरं कशी राबवतात बघू या?, आंदोलन सुरु आहे म्हणून शिबीरं घेतायत का तेही बघू, असंही मनोज जरांगे म्हणाले. मार्गदर्शक सांगतील तसं सरकारचं शिष्टमंडळ वागतं. शिष्टमंडळ येण्याची मी वाट बघत नाही. मी मुंबईला जाणार हे निश्चित आहे. 12 तारखेला एकत्र आलो की तारीखच जाहीर करु, असंही मनोज जरांगेंनी सांगितले.

जशी व्यक्ती तशी प्रवृत्ती… त्यामुळे तसे शब्द वापरावे लागतात
भाषेबाबत बोलताना मनोज जरांगे म्हणाले, आधी चांगली भाषा वापरत होतो. ३ वर्षे एकनाथ शिंदेंना चांगला बोललो. हे जातीच्या नाही पक्षाच्या बाजूने बोलत आहे. मंत्री संजय शिरसाट यांच्यामुळे एकनाथ शिंदे आणि माझे संबंध खराब झाले. जशी व्यक्ती तशी प्रवृत्ती… त्यामुळे तसे शब्द वापरावे लागतात. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी चूक केली. त्यामुळे मी बोलणार, पक्षाच्या नाही जातीच्या बाजूने बोलणार…असं मनोज जरांगे म्हणाले.

ताज्या बातम्या

MPSC Exam : महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली;...

0
मुंबई | Mumbai महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात येणाऱ्या 'महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६' च्या तारखेत मोठा बदल करण्यात आला आहे.पूर्व नियोजित वेळापत्रकानुसार २५...