Monday, August 31, 2026
HomeनाशिकNashik Potholes News : सराफ बाजारातील खड्ड्यांची वरवरची मलमपट्टी ; नागरिकांचा संताप

Nashik Potholes News : सराफ बाजारातील खड्ड्यांची वरवरची मलमपट्टी ; नागरिकांचा संताप

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या सराफ बाजार आणि लगतच्या गल्लीबोळांमध्ये गेल्या वर्षभरापासून पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक (Citizen) आणि व्यापारी त्रस्त झाले आहेत. या संदर्भात वर्तमानपत्रांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर महानगरपालिका प्रशासन व ठेकेदाराने अखेर दखल घेतली खरी, परंतु ही डागडुजी अत्यंत निकृष्ट दर्जाची झाल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे.

हे देखील वाचा : Nashik Potholes News : नाशिक खड्डेमुक्तीसाठी भुजबळांना पालकमंत्री करा; दत्तक पालक फडणवीसांकडे राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी

स्थानिक नागरिक कृष्णा नागरे यांनी प्रशासनाच्या या कारभारावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. आज (दि.३ ऑगस्ट) रोजी सकाळी १०:३० वाजता ठेकेदाराने येऊन केवळ खडी टाकून त्यावर रोलर फिरवला. खड्ड्यांवर (Potholes) कोणतीही योग्य प्रक्रिया न करता केवळ वरवरची मलमपट्टी करण्यात आली आहे. थोडासा पाऊस (Rain) झाला तरी हा रस्ता पुन्हा उखडणार असून नागरिकांचे हाल कायम राहतील,असा दावा त्यांनी केला.

हे देखील वाचा : Chhagan Bhujbal : “त्याचा अर्थ पालकमंत्री करा असा…”; शहरात लावलेल्या फलकांवर मंत्री भुजबळांचे स्पष्टीकरण

या परिसरात बालरक्षक मंदिर व शाळा असल्याने रोज सकाळी लहान मुले आणि पालक येथून ये-जा करतात. रस्ता खराब असल्यामुळे अनेक जण घसरून पडल्याचे प्रकार घडले आहेत.निकृष्ट दर्जाच्या कामामुळे केवळ जनतेच्या पैशांचा अपव्यय होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.तर नाशिकचे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, महापौर आणि उपमहापौर यांनी स्वतः या ठिकाणी येऊन रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करावी व कंत्राटदाराकडून दर्जात्मक काम करून घ्यावे, अशी आग्रही मागणी स्थानिकांनी केली आहे.

ताज्या बातम्या

‘सिंहस्थ संस्कृती’ प्रदर्शनाचा समारोप; दुर्मीळ छायाचित्रांतून उलगडला नाशिकच्या सिंहस्थ परंपरेचा इतिहास

0
नाशिक : जिमाका वृत्तसंस्था Nashik नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आठवणी जपणाऱ्या ‘सिंहस्थ संस्कृती’ या तीन दिवसीय प्रदर्शनाचा रविवारी समारोप झाला. रोटरी क्लब ऑफ नाशिक नाईन हिल्स...