Friday, September 25, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमणिपूरच्या ‘नट संकीर्तन महाजेग्या’ने कुंभ भक्ती संगमात फुलविला भक्तिरस

मणिपूरच्या ‘नट संकीर्तन महाजेग्या’ने कुंभ भक्ती संगमात फुलविला भक्तिरस

नाशिक, दि. ३० ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा) : Nashik

- Advertisement -

भक्ती, कीर्तन आणि संगीताच्या अनोख्या संगमातून साकारलेल्या ‘कुंभ भक्ती संगम’मध्ये मणिपूरच्या पारंपरिक ‘नट संकीर्तन महाजेग्या’ या कलाप्रकाराचे प्रभावी सादरीकरण झाले. मणिपूरच्या कलाकारांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गायन, ताल आणि पारंपरिक वाद्यांच्या साथीने सादरीकरण करत उपस्थितांना भक्तिरसाचा अनुभव दिला.

मणिपूरच्या वैष्णव भक्ती परंपरेशी जोडलेल्या या संकीर्तनामध्ये सामूहिक गायन, तालबद्ध वादन आणि आध्यात्मिक भाव यांचा सुंदर आविष्कार पाहायला मिळाला. कलाकारांच्या लयबद्ध सादरीकरणामुळे ठक्कर डोम परिसरातील वातावरण भक्तिमय झाले. पारंपरिक वेशभूषेतील कलाकारांचे सादरीकरणही रसिकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले.

देशाच्या विविध भागांतील भक्तीपरंपरा आणि लोककलांना एकाच व्यासपीठावर आणणाऱ्या ‘कुंभ भक्ती संगम’मध्ये मणिपूरच्या या अनोख्या संकीर्तन परंपरेने ईशान्य भारताच्या सांस्कृतिक वैभवाची ओळख श्रीकृष्णाची शक्ती आणि राधेच्या भक्तीतून उपस्थितांना करून दिली.

‘नट संकीर्तन महाजेग्या’च्या सादरीकरणाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांचे कौतुक केले. विविध प्रांत, विविध परंपरा आणि एकच भक्तिभाव या भावनेचा प्रत्यय देणारे हे सादरीकरण ‘कुंभ भक्ती संगम’च्या सांस्कृतिक एकात्मतेचे प्रभावी दर्शन घडविणारे ठरले.

ताज्या बातम्या

Nashik News : संकटाच्या काळात बांधावर पोहोचा; कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंचे अधिकार्‍यांना...

0
नाशिक |प्रतिनिधी| Nashik पावसातील खंडामुळे निर्माण झालेली पीक परिस्थिती, पीक विमा, वीजपुरवठा आणि शेतकर्‍यांच्या नुकसानभरपाईच्या प्रश्नांवर शासनाने गांभीर्याने लक्ष केंद्रित केले असून, ङ्गशेतकरी प्रथमम या...