Tuesday, January 6, 2026
HomeनाशिकNashik News : मुख्यमंत्री आज नाशकात; व्हीआयपी दौऱ्यासह दिल्ली स्फोटानंतर शहर पोलीस...

Nashik News : मुख्यमंत्री आज नाशकात; व्हीआयपी दौऱ्यासह दिल्ली स्फोटानंतर शहर पोलीस अधिक ‘सतर्क’

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नवी दिल्ली (New Delhi) येथील लाल किल्ला परिसरातील स्फोट (Red Fort Area Blast) आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) गुरुवारी (दि. १३) नाशिक दौऱ्यावर येत असल्याने शहर पोलिसांनी चोख बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमस्थळांची बॉम्बशोधक पथकाकडून कडक तपासणीसह पोलीस शहरात अधिक सतर्क असणार आहेत.

- Advertisement -

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांच्या नेतृत्वात शहर गुन्हेशाखेचे पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांच्या सूचनेने पोलिसांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नाशिक दौऱ्याच्या (Nashik Visit) पार्श्वभूर्मीवर बंदोबस्ताच्या नियोजनाचा आढावा घेतला. यावेळी परिमंडळ एकच्या उपायुक्त मोनिका राऊत, परिमंडळ दोनचे उपायुक्त किशोर काळे, गुन्हेशाखेचे सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्यासह शेखर देशमुख, डॉ. सचिन बारी, संगीता निकम, अद्विता शिंदे उपस्थित होते.

YouTube video player

नवी दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात सोमवारी (दि.१०) रात्री झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर शहरातील अतिसंवेदनशिल ठिकाणी पोलीस बंदोबस्त तर, गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी पोलिसांकडून करडी नजर ठेवली जात आहे. आज (दि १३) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिक दौऱ्यावर येत असून, त्यांच्या उपस्थितीमध्ये दिवसभर भरगच्च कार्यक्रम आहेत. त्या अनुषंगाने शहर पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. याचा आढावा उपायुक्त चव्हाण यांनी घेतला. कार्यक्रमस्थळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याबाबत दक्षता बाळगतानाच, करडी नजर ठेवली जाणार आहे.

नाशिकमध्ये ‘हाय अॅलर्ट’

दिल्लीत स्फोट झाल्यावर सर्वच संवेदनशील भागात व लष्करी केंद्रे असलेल्या ठिकाणी नाकाबंदी व अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नाशिकमध्ये ‘हाय अॅलर्ट’ लागू असून स्थानिक पोलिसांसह केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनी महत्त्वाच्या ठिकाणी लक्ष केंद्रीत केले आहे. यासह गोपनीय विभागांच्या कार्यालयातही वेगाने घडामोडी घडत आहेत. कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन, आर्टिलरी, तोफखाना व एचएएल या लष्करी यंत्रणांनीदेखील बंदोबस्तात वाढ केली आहे.

या यंत्रणा दक्ष

  • कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन, गांधीनगर
  • देवळाली कॅम्प तोफखाना
  • देवळाली कॅम्प आर्टिलरी सेंटर
  • हिंदुस्थान एरॉनॉटिक्स लिमिटेड (एचएएल)
  • संरक्षण, संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ)
  • इंटेलिजन्स ब्युरो (आयबी)
  • नाशिक शहर पोलिसांचे साडेतीन हजार अधिकारी-कर्मचारी
  • नाशिक ग्रामीणचे दोन हजार अधिकारी-कर्मचारी
  • राज्य गुप्तवार्ता विभाग (एसआयडी)
  • दहशतवादी विरोधी विभाग (एटीएस)
  • दहशतवादी विरोधी कक्ष (एटीसी पोलीस ठाणेनिहाय)

ताज्या बातम्या

Chandrashekhar Bawankule : बावनकुळेंनी अजितदादांना करून दिली 70 हजार कोटींच्या घोटाळ्याची...

0
मुंबई । Mumbai राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. सत्ताधारी महायुतीमध्ये सध्या सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र समोर येत असून,...