Thursday, May 7, 2026
HomeनाशिकCJI Bhushan Gavai : नीतिमुल्ये स्वीकारून प्रत्येक नागरिकांना न्याय मिळेल यादृष्टीने दक्ष...

CJI Bhushan Gavai : नीतिमुल्ये स्वीकारून प्रत्येक नागरिकांना न्याय मिळेल यादृष्टीने दक्ष राहून वाटचाल करावी – सरन्यायाधीश गवई

नाशिक | Nashik

कायद्याचे शिक्षण घेताना विद्यार्थ्यांनी संविधानातील नीतिमुल्ये स्वीकारून प्रत्येक नागरिकांना न्याय मिळेल या दृष्टीने दक्ष राहून वाटचाल करावी, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court) सरन्यायाधीश भूषण गवई (Bhushan Gavai) यांनी केले. येथील एनबीटी विधी महाविद्यालयात संविधान उद्देशिका कोनशिलेचे अनावरण गवई यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

- Advertisement -

यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे (Mumbai High Court) मुख्य न्यायामुर्ती श्रीचंद्रशेखर, न्यायमुर्ती मकरंद कर्णिक, नाशिकचे पालक न्यायमुर्ती सारंग कोतवाल, न्यायमुर्ती अश्विन भोबे, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य जयंत जायभावे, गोखले एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. आर.पी.देशपांडे, सचिव दिप्ती देशपांडे, प्राचार्य ए.जे.कादरी, समन्वयक भारत कौरानी, डॉ.संजय मांडवकर उपस्थित होते.

यावेळी गवई म्हणाले की, संविधानाची (Constitution) उद्देशिका हा संविधानाचा एक भाग आहे. माझ्या शिक्षणाची सुरूवात महापालिका शाळेपासून झाली. आज या पदावर पोहचण्याचे सर्व श्रेय संविधानाचे असून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी प्रगतीपथावर पोहचलो आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपली ध्येये निश्चित करावीत. उच्च ध्येय ठेवल्यास निश्चितच आपल्या क्षेत्रात तुम्ही यशस्वी व्हाल, असा सल्लाही त्यांनी दिला.

तर न्यायमूर्ती श्रीचंद्रशेखर (Justice Srichandrashekhar) म्हणाले की, शहीद भगतसिंग यांचा आज जन्मदिवस आहे. त्यांनी आपले आयुष्य देशसेवेसाठी वेचले. त्याप्रमाणे विधी क्षेत्रात ज्ञान संपादन करून त्याचा लाभ समाजासाठी होईल. तसेच विधीक्षेत्र व समाजाची प्रतिमा मलीन होणार नाही यादृष्टीने विद्यार्थांनी वाटचाल करावी, असे त्यांनी सांगितले. तर कर्णिक म्हणाले की, सरन्यायाधीश भूषण गवई यांचे मार्गदर्शन निश्चितपणे विद्यार्थ्यांना प्रेरक ठरेल, असे त्यांनी म्हटले.

तसेच संस्थेत संविधानाच्या उद्देशिकेच्या कोनशीलेचे अनावरण सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते झाले हा संस्थेसाठी गौरवाचा क्षण आहे. कायद्याचा अभ्यास व वेळेत न्यायदान ही सरन्यायाधीश गवई यांची कार्यशैली असून, विद्यार्थ्यांनी याचा अवलंब करावा. असे संस्थेच्या सचिव श्रीमती देशपांडे प्रास्ताविकात म्हणाल्या.

दरम्यान, देशातील १४० न्ययाधीश व १० हजार वकील देणार्‍या नाशिकच्या एनबीटी विधी महाविद्याालयाचा (NBT Low Collage) यावेळी गौरव झाला. प्राचार्य एच. ए. काद्री, प्रभाकर लव्हाटे, संध्या ग़डाख यानी स्वागत केले. तर मेघा सायखेडकर यांनी सूत्रसंचालन केले.

ताज्या बातम्या

भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई | वृत्तसंस्था Mumbai भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील संबंध अधिक बळकट करण्यासाठी महाराष्ट्र विश्वासार्ह भागीदार म्हणून कार्य करण्यास सज्ज आहे. व्हिएतनाम सोबत सांस्कृतिक, आर्थिक आणि...