Thursday, May 14, 2026
Homeमुख्य बातम्यामोठी बातमी! त्र्यंबक नगरपरिषद, त्र्यंबकेश्वर स्थळास 'अ' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा; CM फडणवीसांची...

मोठी बातमी! त्र्यंबक नगरपरिषद, त्र्यंबकेश्वर स्थळास ‘अ’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा; CM फडणवीसांची माहिती

नाशिक | Nashik

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Simhastha Kumbh Mela) पार्श्वभूमीवर त्र्यंबक नगरपरिषद (Trimbak Municipal Council) आणि त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) या स्थळास ‘अ’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबतची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी एक्स (ट्विट) या सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे त्र्यंबक नगरीच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे.

- Advertisement -

काही महिन्यांपूर्वीच राज्य सरकारच्या नगरविकास खात्याने त्र्यंबकेश्वर देवस्थान (Trimbakeshwar Temple) तीर्थक्षेत्राला ‘अ’ वर्गाचा दर्जा जाहीर केला होता. विभागीय आयुक्तांनी जानेवारी २०२५ मध्ये त्र्यंबकेश्वर देवस्थान तीर्थक्षेत्राला ‘अ’ वर्गाचा दर्जा मिळावा यासाठी प्रस्ताव पाठविला होता. यानंतर मार्च २०२५ मध्ये राज्य सरकारने त्र्यंबकेश्वर देवस्थानाला ‘अ’ वर्गाचा दर्जा जाहीर केला होता.

त्यानंतर आता त्र्यंबक नगरपरिषद आणि त्र्यंबकेश्वर या स्थळास ‘अ’ वर्ग पर्यटनस्थळाचा (Tourism Destination) दर्जा जाहीर केला आहे. यामुळे त्र्यंबकेश्वर शहराचा विकास होण्यास मदत होणार आहे. तर त्र्यंबकेश्वर देवस्थान तीर्थक्षेत्राला ‘अ’ वर्गाचा दर्जा जाहीर केल्यामुळे शहराच्या विकासासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय निधी मिळण्याचे मार्ग खुले झाले होते.

सिंहस्थ प्राधिकरणासाठी १००० कोटींचा निधी जाहीर

सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाला पावसाळी अधिवेशनात १००० कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला आहे. यामुळे प्राधिकरणाच्या कामाला खऱ्या अर्थाने गती मिळणार असून पावसाळ्यानंतर कामे गतीने सुरू होण्यास मदत होणार आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : राजुरच्या तरूणाची ‘एटीएस’कडून चौकशी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात असल्याच्या संशयावरून अकोले तालुक्यातील राजुर येथील एका तरूणाची महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस)...