Wednesday, October 7, 2026
HomeनगरParner : 23 कोटींच्या व्यवहारानंतर 340 कोटींचे कर्ज!

Parner : 23 कोटींच्या व्यवहारानंतर 340 कोटींचे कर्ज!

पारनेर कारखाना खरेदीप्रकरणी चोरडिया बंधूंची चौकशी

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

देवीभोयरे येथील पारनेर सहकारी साखर कारखाना खरेदीसाठी पुण्याचे माजी खासदार विदुरा नवले यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील आठ सदस्यांना सुमारे 23 कोटी रुपये दिल्याची कबुली पुण्यातील पंचशील समूहाचे बांधकाम उद्योजक अतुल चोरडिया व अशोक चोरडिया यांनी पोलीस चौकशीत दिल्याची माहिती कारखाना बचाव समितीचे वकील तथा फिर्यादी रामदास घावटे यांनी दिली.

- Advertisement -

या प्रकरणाच्या तपासासाठी पारनेर पोलिसांनी गेल्या आठवड्यात अतुल चोरडिया व अशोक चोरडिया यांना नोटीस बजावली होती. चौकशीत चोरडिया बंधूंनी 2015 मध्ये पुण्यातील ताथवडे येथील नवले कुटुंबीयांकडून सुमारे एक हेक्टर जमीन विकासासाठी नोटरी कराराने घेतल्याचे आणि त्यापोटी पारनेर साखर कारखाना खरेदीसाठी सुमारे 23 कोटी रुपये आगाऊ दिल्याचे सांगितले. मात्र, दोन वर्षांनी वाद झाल्यानंतर विकास करार रद्द करून 2018 मध्ये ही रक्कम परत घेतल्याचे त्यांनी जबाबात नमूद केले असून, संबंधित कागदपत्रे पोलिसांकडे सादर केली आहेत.

जमीन विकासाच्या नावाखाली कथित बोगस करार करून कारखाना खरेदीसाठी निधी उभारण्यात आला आणि त्यानंतर कारखान्याच्या मालमत्तेवर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून सुमारे 340 कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात आल्याचा आरोप कारखाना बचाव समितीने केला आहे. ताथवडे येथे संबंधित विकासकामाच्या ठिकाणी सध्या अन्य बांधकाम कंपनीचे काम सुरू असल्याचेही फिर्यादी रामदास घावटे यांनी सांगितले. या प्रकरणात नवले कुटुंबातील नऊ आरोपींना आर्थिक मदत केल्याचे तपासातून स्पष्ट झाल्याचा दावा करत चोरडिया बंधूंना सहआरोपी करण्याची मागणी कारखाना बचाव समितीने पोलिसांकडे केली आहे.

महिला खासदाराशी संबंधित कंपनीची चौकशी करा
पारनेर साखर कारखाना खरेदीतील कथित गैरव्यवहारात अक्षर लँड डेव्हलपर्स या खाजगी कंपनीने आरोपींना सुमारे नऊ कोटी रुपये पुरविल्याचे पुरावे असल्याचा दावा कारखाना बचाव समितीने केला आहे. ही कंपनी एका विद्यमान महिला खासदाराशी संबंधित असून, त्यांची या कंपनीत भागीदारी असल्याचाही दावा करण्यात आला आहे. सदर महिला खासदाराचे नवले व चोरडिया कुटुंबीयांशी जवळचे संबंध असल्याचे सांगत, आरोपींना कंपनीकडून सुमारे नऊ कोटी रुपये कोणत्या कारणासाठी देण्यात आले, याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी फिर्यादी रामदास घावटे यांनी तपासी अधिकारी सोमनाथ दिवटे यांच्याकडे केली आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : छाननीनंतर सुनावणीसाठी उमेदवारांसह इच्छुकांची धावपळ

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या 369 उमेदवारी अर्जांची मंगळवारी निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश सुरवसे यांच्या कार्यालयात छाननी करण्यात आली. सकाळी 11 ते...