Sunday, November 8, 2026
Homeक्राईमCrime News : भिवंडीकडे जाणारा गुटख्याचा 12.81 लाखांचा साठा जप्त

Crime News : भिवंडीकडे जाणारा गुटख्याचा 12.81 लाखांचा साठा जप्त

एलसीबी व अन्न-औषध प्रशासनाची संयुक्त कारवाई || दोघे ताब्यात

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

अहिल्यानगरमधून भिवंडी येथे विक्रीसाठी बेकायदेशीररीत्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ घेऊन जाणार्‍या पिकअप वाहनावर स्थानिक गुन्हे शाखा व अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने संयुक्त कारवाई केली. नांदगाव (ता. अहिल्यानगर) परिसरात केलेल्या या कारवाईत दोन जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून वाहनासह 12 लाख 81 हजार 135 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

- Advertisement -

पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार विजय ठोंबरे, संतोष खैरे, अभिजीत अरकल, रणजीत जाधव व भगवान धुळे यांचे पथक सोमवारी (5 ऑक्टोबर) एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांची माहिती घेत असताना, अहिल्यानगरमधून नगर-मनमाड मार्गे पिकअपमधून गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ भिवंडी येथे विक्रीसाठी नेण्यात येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने ही माहिती अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी प्रदीप पवार यांना दिली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा व अन्न- औषध प्रशासनाच्या पथकाने पंचांसमक्ष नांदगाव येथील इसार पेट्रोलपंपासमोर, हॉटेल खालसा पंजाबजवळ सापळा रचून पिकअप (एमएच 04 एमआर 2329)ची तपासणी केली.

वाहनात सुगंधित सुपारी, सुगंधित तंबाखू आणि गुटखा आढळून आला. या कारवाईत कैफ अहमद अल्ताफ शेख (वय 45, रा. शांतीनगर, भिवंडी, ठाणे) आणि वाजीद उर्फ गोल्डी शब्बीर शेख (वय 29, रा. बुर्‍हाणपूर, लोहारमंडी, लालबाग, मध्य प्रदेश) यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये सात लाख 81 हजार 135 रूपयांचा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ आणि पाच लाखांची पिकअप वाहन यांचा समावेश आहे. दरम्यान, ताब्यातील संशयितांकडे चौकशी केली असता, हा माल राजु कुरेशी उर्फ मोहम्मद मुस्लीम मोहंमद्दीर अन्सारी व इम्रान उर्फ मोहम्मद इकबाल कुरेशी (दोघेही रा. भिवंडी), तसेच भूपेंद्र बापु सिंह व अक्षय गुप्ता (दोघेही रा. इंदौर) यांच्या सांगण्यावरून खरेदी केल्याची माहिती त्यांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. हे चारही संशयित पसार असून या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

कळवण : होलसेल किराणा दुकानाच्या गोडाऊनला आग; कोट्यावधी रुपयांचा माल जळून...

0
कळवण | प्रतिनिधी Kalwan दिवाळीचा सण, लक्ष्मीपूजनाचा मंगल दिवस आणि बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण असतानाच कळवण शहराला रविवारी सकाळी मोठा धक्का बसला. शहरातील सबस्टेशन ते कळवण...