Thursday, July 2, 2026
Homeनाशिकविळखा घट्ट! एका 87 रुग्ण पॉझिटीव्ह; जिल्ह्याची संख्या 463 ;मालेगावी 62, येवल्यात...

विळखा घट्ट! एका 87 रुग्ण पॉझिटीव्ह; जिल्ह्याची संख्या 463 ;मालेगावी 62, येवल्यात 16 ,देवळालीत 7 करोनाबाधित आढळले

नाशिक/मालेगाव।

मालेगावसह आता जिल्ह्याभरातही करोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. आज दिवसभरात 87 रुग्णांची भर पडली आहे. यात मालेगावच्या 62, येवला येथील 16 तर देवळाली कॅम्प येथील 7 व नाशिक शहरातील दोघांचा समावेश आहे. मालेगावचा आकडा 386 वर पोहचला आहे. तर एकुण जिल्ह्याचा आकडा 463 झाला आहे.
जिल्ह्यात आज (दि.4) दिवसभरात करोनाचे 144 अहवाल प्राप्त झाले आहेत.

- Advertisement -

यात 132 अहवाल निगेटिव्ह आले यामुळे काही प्रमाणात प्रशासनास दिलासा मिळाला होंता. तर 12 अहवाल पॉझिटिव्ह होते. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये मालेगाव येथील 54 यासह दोन वृद्धांचे दोन दुसर्‍यांदा पॉझिटिव्ह आले आहेत.

नाशिक शहरातील बजंरगवाडी येथील गरोदर महिला तीच्यासह सटाणा तालुक्यातील फुलेनगर, सिन्नर तालुक्यतील वडगाव, येवला येथील रूग्णांचा समावेश होता. दरम्यान आज रात्री उशिरा 93 अहवाल प्राप्त झाले. यामध्ये 42 पॉझिटिव्ह तर 51 निगेटिव्ह आले. नाशिक शहरातील महिलेचा तसेच मालेगाव येथील दोघांचा मृत्यू झाला आहे.

आजच्या अहवालांमुळे एकुण करोनाग्रस्तांची संख्या 463 झाली आहे. यामध्ये मालेगावचे 62 आहेत, यात 5 पोलीसांचा समावेश आहे. एका रुग्णाचा अहवाल दुसर्‍यांदा पॉझिटिव्ह आला आहे. येवला येथील एकदम 16 तसेच देवळाली कॅम्प येथील 7 अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. देवळाली येथील अहवाल मिलिट्रीच्या जवानाच्या सानीध्यातील लोकांचे आहेत.

परंतु ते मिलिटरी जवान तर शहरातील एका जिल्हा रूग्णालयातील डॉक्टरांचाही यात सामावेश आहे. यानुसार नाशिक महापालिका हद्दीतील 20, ग्रामिण भागातील 56 तर बाहेरीच्या जिल्ह्यातील 6 रूग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, जिल्ह्यात आजपर्यंत 19 हजार 940 रूग्णांचे स्क्रीनींग करण्यात आले आहे. जिल्ह्यातून आजपर्यंत 3486 स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. यातील 2731 निगेटिव्ह, 424 पॉझिटिव्ह आले 633 संशयित रूग्ण उपचार घेत आहेत. तर अद्याप 354 अहवाल प्रलबिंत आहेत. 15 जणांचा मृत्यू झाला असून 33 जण पुर्ण बरे होऊन मुक्त झाले आहेत.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : सक्तीने धार्मिक परिवर्तन करण्याचा प्रयत्न; सरकारवाडा पोलीस...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik उदरनिर्वाहासाठी परराज्यातून नाशिकमध्ये (Nashik) आलेल्या एका एकाकी महिलेला जाळ्यात ओढून तिच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेतल्याची घटना समोर आली आहे. लग्नाचे खोटे...