Tuesday, October 27, 2026
HomeनाशिकEknath Shinde : शेतकऱ्यांनो धीर सोडू नका, चुकूनही आत्महत्येचा विचार करू नका;...

Eknath Shinde : शेतकऱ्यांनो धीर सोडू नका, चुकूनही आत्महत्येचा विचार करू नका; शिवसेना तुमच्या पाठीशी खंबीर – DCM शिंदे

नाशिक | Nashik

यंदा दुष्काळामुळे (Drought) शेतकर्‍यांसमोर मोठे संकट आहे, पण कोणीही काळजी करू नका आणि धीर सोडू नका. दुष्काळात मिळणाऱ्या सर्व सवलती आणि मदत शेतकऱ्यांना मिळेल. मनात चुकूनही आत्महत्येचा विचार आणू नका, आपल्या अडचणी कार्यकर्त्यांना सांगा. शेतकरी एकटा नसून सरकार आणि संपूर्ण शिवसेना त्याच्या पाठीशी उभी आहे, असा दिलासा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शेतकऱ्यांना दिला.

- Advertisement -

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील (Trimbakeshwar Taluka) हरसूल (Harsul) येथील आदिवासी बहुल भागातील दुष्काळग्रस्त नागरिकांना दिवाळी फराळाच्या १० हजार शिधा किटचे वाटप शिवसेनेतर्फे (Shivsena) करण्यात आले. त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी त्यांनी या उपक्रमामुळे दुष्काळाच्या सावटात असलेल्या शेतकऱ्यांची (Farmer) दिवाळी गोड होण्यास मदत होणार असल्याचे म्हटले.

बळजबरीने कर्ज वसुली करणार्‍यांना खडी फोडायला पाठवू

यावेळी शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या बँका (Bank) आणि खासगी फायनान्स कंपन्यांना इशारा देताना शिंदे म्हणाले, “शेतकऱ्यांकडून कोणी बळजबरीने कर्जाची वसुली करत असेल, तर त्याला तातडीने पोलिसांच्या हवाली करा. अशावर कठोर कारवाई केली जाईल. बँका किंवा फायनान्स कंपन्यांनी शेतकर्‍यांना त्रास दिला, तर त्यांना तुरुंगात खडी फोडायला पाठवल्याशिवाय राहणार नाही. सरकारने घेतलेले निर्णय शेतकर्‍यांना वाचवण्यासाठी आहेत, त्यांची कोणीही पिळवणूक करू नका”, असे त्यांनी सांगितले.

हे देखील वाचा : Eknath Shinde : राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता श्रेष्ठ, सिंहस्थामुळे विकास अन् रोजगाराला चालना मिळणार – DCM शिंदे

जिथे आपत्ती, तिथे शिवसेना

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिकवणुकीची आठवण करून देत एकनाथ शिंदे म्हणाले, शेतकर्‍यांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी तातडीने ‘शेतकरी मदत कक्ष’ सुरू करावेत. ज्या गरीब आणि आदिवासी शेतकर्‍यांकडे मुलांच्या लग्नाची ऐपत नाही, त्यांच्या मुलांचे सामुदायिक विवाह सोहळे शिवसेनेच्या वतीने आयोजित केले जातील. तसेच जिथे पाणीटंचाई असेल तिथे टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाईल. याशिवाय पुढील वर्षी जूनपर्यंत पाण्याचे आणि जनावरांच्या चाऱ्याचे नियोजन करण्यात येईल, असे म्हणत त्यांनी ‘जिथे आपत्ती तिथे शिवसेना’ शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभी राहील, असे उपमुख्यमंत्र्यांनी म्हटले.

शिवसैनिकांना बांधावर जाण्याचे आवाहन

मी स्वतः एका सामान्य शाखाप्रमुखापासून राज्याच्या मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचलो. त्यामुळे मला गरिबांचे दुःख पूर्णपणे माहीत आहे. जिथे गाडी पोहोचू शकत नाही, तिथे आपली मदत पोहोचली पाहिजे, असे म्हणत त्यांनी नाशिक महापालिकेचे उपमहापौर विलास शिंदे (Vilas Shinde) यांच्या कार्याचे कौतुक केले. तसेच, सर्व शिवसैनिकांनी दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकर्‍यांच्या थेट बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी सोडवाव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.

संकटात जो मदत करतो,तोच…

संकटात जो मदत करतो, तोच कायमचा लक्षात राहतो. हजारो-लाखो हात शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे आले पाहिजेत. जेव्हा जेव्हा तुम्हाला माझी गरज भासेल, तेव्हा हा एकनाथ शिंदे तुमच्या मदतीसाठी हजर असेल.

एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री

ताज्या बातम्या

MLC Election 2026 : नागपूरात मतपत्रिकांवरून आक्षेप, अमरावतीत ‘जुनी पेन्शन’चा मजकूर;...

0
मुंबई | Mumbai महाराष्ट्र विधानपरिषद शिक्षक आणि पदवीधर अशा पाच मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज (मंगळवारी) सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीस (Vote Counting) सुरुवात झाली आहे. टपाली मतांच्या...