नाशिक | प्रतिनिधी | Nashik
भारतीय संस्कृतीत मौनी अमावस्येला (Mauni Amavasya) गंगेत स्नान करुन दान धर्माला विशेष महत्त्व असल्याने आज दिवसभर रामकुंडावर (Ramkund) स्नान (Bathing) करुन गोरगरिबांना अन्न धान्य दान देण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.
त्यामुळे मालेगाव स्टॅण्डकडून रामकुंडाकडे जाणारी वाहतुक (Transportation) बंद करण्यात आली होती. हा दिवस प्रयागराजमधील महाकुंभ पर्वणीचा असल्याने पुण्य प्राप्तीचा,पवित्र स्नानाचा आणि दान करण्याचा दिवस मानला गेला. रामकुंडावर मुंबई, कर्नाटक तसेच नाशिक शहर परिसरातील (Nashik City Area) भाविकांनी पहाटेपासूनच स्रानासाठी गर्दी केली होती.
दरम्यान, रामकुंडापासून दुतोंड्या मारुतीपर्यंत गोदावरी नदीच्या दोन्ही काठावर भाविकांच्या (Devotees) गर्दी कुंभपर्वातील स्रानाची आठवण करून देत होती. यामुळे जणू रामकुंडाला मीनी कुंभ स्नानाच्या पर्वणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. यावेळी रामकुंड,गांधीतलाव, दुतोंड्या मारुती कुंडापर्यंत भाविक घाटावर बसून डुबकी मारतांना दिसले.