Tuesday, October 20, 2026
HomeनाशिकNashik News : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे निलंबित

Nashik News : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे निलंबित

नाशिक | प्रतिनिधी | Nashik


जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे (Dr. Sudhakar More) यांना शासनाने निलंबित केले आहे. त्यांच्या कामकाजाबाबत गेल्या तीन वर्षांत मोठ्या प्रमाणात तक्रारी करण्यात आल्या होत्या. कामे वेळेत न करणे, कर्मचाऱ्यांना दुय्यम वागणूक देणे, कर्मचाऱ्यांचा छळ करणे, कामावर (Work) नियमित हजर न राहणे, आरोग्य केंद्रांना भेटी न देणे तसेच बदल्यांमध्ये आर्थिक गैरव्यवहाराच्या तक्रारी त्यांच्याविरोधात करण्यात आल्या होत्या.

- Advertisement -

राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबिटकर यांच्या गत महिन्यातील नाशिक जिल्हा (Nashik District) दौऱ्यावेळी जिल्ह्यातील मंत्री आणि विविध लोकप्रतिनिधींनी डॉ. मोरे यांच्या कामकाजाबाबत लेखी तक्रारी केल्या होत्या. डॉ. मोरे कामे ऐकत नाहीत, जबाबदारी झटकतात आणि कर्मचाऱ्यांना त्रास देतात, अशा तक्रारी यावेळी करण्यात आल्या. तसेच डॉ. मोरे यांची बदली करण्याची मागणीही लोकप्रतिनिधींनी आरोग्यमंत्र्यांकडे केली होती.

दरम्यान, डॉ. मोरे यांच्या कामकाजाबाबत यापूर्वीही चौकशी झाली होती. वर्षभरापूर्वी जिल्हा परिषदेच्या विशाखा समितीकडेही त्यांच्या विरोधात तक्रार दाखल झाली होती. समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या बदली प्रकरणातही त्यांच्या कामकाजावर ठपका ठेवण्यात आला होता. वाढत्या तक्रारींची दखल घेत आरोग्य विभागाने सुमारे १५ दिवसांपूर्वी डॉ. मोरे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यांनी त्यावर खुलासा सादर केला. मात्र, हा खुलासा समाधानकारक नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आरोग्य विभागाने त्यांच्या निलंबनाचे आदेश काढले. निलंबनाचे आदेश प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून (Health Department) देण्यात आली.

डॉ. थविल यांचेही निलंबन

सुरगाणा तालुक्यातील पांगरे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जयेंद्र थविल यांचेही शासनाने निलंबन केले आहे. त्यांच्या कामकाजाबाबत जुन्या तक्रारी असून, त्यासंदर्भात चौकशी सुरू होती. मुख्यालयी न थांबणे, रुग्णांची तपासणी न करणे आदी तक्रारी लोकप्रतिनिधींनी केल्या होत्या. या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर डॉ. थविल यांच्यावरही निलंबनाची कारवाई झाल्याची माहिती आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँक निवडणूक; ‘मनोमिलन’ की ‘सीमोल्लंघन’?

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राजकीय नेत्यांच्या हालचालींना वेग आला असतानाच विधान परिषदेचे सभापती तथा भाजपचे नेते राम शिंदे यांनी पुन्हा एकदा...