Wednesday, October 21, 2026
HomeनाशिकNashik News : मतदार यादी पुनरीक्षण अधिक पारदर्शी होण्यासाठी राजकीय पक्षांनी मतदान...

Nashik News : मतदार यादी पुनरीक्षण अधिक पारदर्शी होण्यासाठी राजकीय पक्षांनी मतदान केंद्रनिहाय BLA ची नेमणूक करावी – विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

नाशिक | Nashik

मतदार यादी (Voter List) सखोल पुनरीक्षण कार्यक्रम अधिक गतिमान करून मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत व पारदर्शी होण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी मतदान केंद्रनिहाय बीएलएची नेमणुक करावी. तसेच या प्रक्रियेत कोणत्याही स्तरावर हलगर्जीपणा होणार नाही, याची सर्व संबंधितांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम ( Dr. Pravin Gedam) यांनी आज दिले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात ( District Collector’s office) विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरिक्षक डॉ. गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली मतदार यादीचा आढावा व सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस आमदार सीमा हिरे, नितीन पवार, हिरामण खोसकर, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अपर आयुक्त अरविंद लोखंडे, मनपा अतिरिक्त आयुक्त अमित रंजन, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मधुमती सरदेसाई, विविध राजकीय पक्षांचे जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, पदाधिकारी, प्रतिनिधी तसेच नाशिक जिल्ह्यातील सर्व मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

विभागीय आयुक्त डॉ. गेडाम म्हणाले की, आगामी काळात मतदान केंद्रांची (Voting Centre) रचना करताना मतदारांना कोणतीही अडचण येणार नाही, याची विशेष दक्षता घ्यावी. मतदान केंद्राचे ठिकाण, मतदारांची संख्या तसेच उपलब्ध सुविधा यांचा विचार करून मतदारस्नेही आणि सुलभ मतदान केंद्रांची रचना करावी. मतदारांच्या सुविधेला प्राधान्य देण्यात यावे. मतदार यादी पुनरीक्षणाच्या कामात प्रत्यक्ष क्षेत्रीय पातळीवर काम करणाऱ्या बीएलओंची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे त्यांच्याकडून होणाऱ्या कामाचा नियमित आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना द्याव्यात. मतदार यादी पुनरावलोकनाच्या प्रक्रियेत प्रत्येक मतदाराची नोंद काळजीपूर्वक तपासावी. पात्र मतदाराचे नाव कोणत्याही परिस्थितीत चुकीने वगळले जाणार नाही, याची दक्षता घेत दावे व हरकतींची नियमानुसार काटेकोर छाननी करावी. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष व नागरिकाभिमुख पद्धतीने राबवावी. कामात जाणीवपूर्वक दिरंगाई अथवा निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी, असे निर्देशही विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी दिले.

तसेच जिल्ह्यात (District) आतापर्यंत ४० लाख ७६ हजार ६६६ मतदारांचे फॉर्म भरून घेण्यात आले आहेत, तर १० लाख २७ हजार ८९२ मतदारांचे फॉर्म ‘अनकलेक्टेबल’ असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. विशेषतः शहरी भागात ‘अनकलेक्टेबल’ मतदारांची संख्या मोठी असल्याने अशा मतदारांच्या नोंदींची योग्य तपासणी करून आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी दिल्या.

ते पुढे म्हणाले की, मतदार यादी पुनरावलोकनांतर्गत सध्या मोठ्या प्रमाणावर प्राप्त झालेले अर्ज, नोंदी व उपलब्ध माहितीची तपासणी सुरू आहे. एकाच मतदाराची दोन किंवा त्यापेक्षा अधिक ठिकाणी नोंद असणे, मतदाराचे स्थलांतर होणे, मृत्यू झालेला असणे अथवा अन्य कारणांमुळे नोंदीमध्ये बदल आवश्यक असणे, अशा प्रकरणांची नियमानुसार पडताळणी करण्यात येत आहे. मतदाराचे नाव मतदार यादीतून वगळण्यापूर्वी संबंधित नोंदीची वस्तुनिष्ठ पडताळणी करावी. आवश्यक त्या प्रकरणात संबंधित मतदारास नोटीस देऊन त्याला आपले म्हणणे मांडण्याची संधी द्यावी. प्राप्त दावे व हरकतींचीही योग्य पद्धतीने तपासणी करूनच अंतिम निर्णय घ्यावा, तसेच मतदारांना आपल्या नावाची मतदार यादीतील नोंद तपासता यावी व नोंदीमध्ये काही त्रुटी असल्यास त्या दुरुस्त करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करता यावी, यासाठी त्यांना सहकार्य करावे. मतदार यादीतील नाव, पत्ता, वय अथवा अन्य तपशीलांबाबत नागरिकांनी संबंधित निवडणूक कार्यालयाशी संपर्क साधून आवश्यक ती कार्यवाही करून घ्यावी. तसेच जिल्ह्यातील सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मतदार यादी पुनरावलोकनाची प्रक्रिया निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करताना प्रत्येक नोंदीची अचूकता व वैधता तपासावी, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

नागरिकांच्या (Citizen) सहभागासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी प्रशासनाला दिल्या. मतदार यादी अद्ययावत करण्याची प्रक्रिया ही निरंतर स्वरूपाची आहे. त्यामुळे पात्र नागरिकांना नियमानुसार मतदार म्हणून नोंदणी, दुरुस्ती अथवा आवश्यक बदल करण्याची संधी उपलब्ध असते. नागरिकांनी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवून आपली मतदार नोंदणी अद्ययावत असल्याची खात्री करावी, असेही आवाहन विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी केले. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील पुनरीक्षण कार्यक्रमाची सद्यस्थिती व प्रगतीची माहिती दिली. यावेळी राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनीही काही मौलीक सुचना केल्यात.

ताज्या बातम्या

…तर भविष्यात बिश्नोईच्या नावाने राजकीय नेत्यांच्या हत्या होतील, राऊतांचा खळबळजनक दावा

0
मुंबई । Mumbai देशाच्या राजकारणात आणि गुन्हेगारी जगतात सध्या 'लॉरेन्स बिश्नोई' या नावाभोवती अनेक चर्चा रंगल्या आहेत. मात्र, याच नावाचा वापर करून देशात मोठा राजकीय...