Tuesday, September 15, 2026
Homeनाशिकआरोग्य साक्षरता म्हंजे काय गं बाई ?

आरोग्य साक्षरता म्हंजे काय गं बाई ?

नाशिक | डॉ.माधवी गोरे – मुठाळ

जागतिक महिलादिन (International Women Day) अलीकडेच साजरा झाला. या पार्श्वभूमीवर महिलांच्या आरोग्यावर चर्चा संयुक्तिक म्हणावी लागेल. संपूर्ण कुटुंबाच्या (Famly) आरोग्याबद्दल काळजी करणाऱ्या महिला स्वतःच्या आरोग्याबद्दल किती जागृत असतात या प्रश्नाचे उत्तर निराशाजनक येईल हे वेगळे सांगण्याचीही गरज नाही. आज बऱ्याच महिलांना आरोग्य साक्षरता म्हणजे काय तेसुद्धा सांगण्याची आवश्यकता आहे.आरोग्य साक्षरता नियमावली ही वैयक्तिक व सामुदायिक आरोग्य टिकवण्यासाठी, आजार टाळण्यासाठी आणि स्वच्छतेच्या सवयी लावण्यासाठी आवश्यक मूलभूत मार्गदर्शक तत्त्वे आहेत. यात शारीरिक, मानसिक स्वच्छता, पौष्टिक आहार, व्यायाम, प्रतिबंधात्मक उपाय (लसीकरण) आणि प्राथमिक उपचार या विषयांवरील ज्ञान साध्या भाषेत समाविष्ट असते.

- Advertisement -

नियमावली काय

वैयक्तिक स्वच्छता – दररोज आंघोळ करणे, हात धुणे, दात घासणे, नखे कापणे, आहार व पोषण – संतु‌लित आणि सकस आहार घेणे, जीवनसत्त्वे, प्रथिने, खनिजे आणि मुबलक पाणी पिणे. शारीरिक व्यायाम – दररोज किमान ३० मिनिटे चालणे, व्यायाम किंवा योगासने करणे. प्रतिबंधात्मक उपाय – आजारी पडण्यापूर्वी काळजी घेणे उदा. लसीकरण, डास नियंत्रण, पाणी उकळून पिणे. मानसिक आरोग्य – तणावमुक्त राहणे, सकारात्मक विचार करणे आणि पुरेशी झोप घेणे. परिसर स्वच्छता – घर, शाळा आणि परिसर स्वच्छ ठेवणे, ओला व सुका कचरा वेगळा करणे. माहिती योग्य आरोग्यविषयक सरकारी योजनाची माहिती मिळवून त्यानुसार कृती करणे.

ही नियमावली केवळ आजारावर उपचार करण्यापेक्षा आजार होऊच नयेत यावर भर देते. सर्वेक्षणामध्ये मासिक पाळीसारख्या विशिष्ट आरोग्य समस्यांबद्दल उच्च पातळीची स्वजागरुक ता सुमारे ८२ टक्के दिसून येते; परंतु औपचारिक शिक्षण आणि शरीराच्या कार्याबद्दल तपशीलवार ज्ञान कमी असते. अनेक महिलांना काहीतरी चुकीचे आहे याची जाणीव असते; परंतु PCOS, रजोनिवृत्ती आणि बंध्यत्व यांसारख्या परिस्थितीची मूळ कारणे समजून घेण्यात त्या कमी पडतात. मासिक पाळी आणि प्रजनन आरोग्य जागरुकता ८२ टक्के महिलांना असते. मासिक पाळीच्या आरोग्याच्या समस्या जसे की, अनियमित मासिक पाळी किंवा PCOS याबद्दल शहरी स्त्रियांना थोडी माहिती असते, पण ती ऐकीव असते. अशिक्षित स्त्रियांना लक्षणाबद्दल माहिती असते, पण त्याचे औपचारिक शिक्षण नसते. यात नच शंकाकुशंका आणि डॉक्टरांच्या सल्ल्याबद्दल अनास्था निर्माण होते.

पुनरुत्पादक आरोग्यावरील एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, ५० टक्क्यांपेक्षा जास्त महिलांना बंध्यत्वाच्या कारणांबद्दल पुरेसे ज्ञान नसते. आपल्याला मूल होऊ शकत नाही हा गोष्टीसाठी स्वतः ती स्त्री आणि तिचे कुटुंबीयही खीलाच जबाबदार ठरवतात आणि तीच वांझोटी आहे, असे लेबल तिला डकवले जाते. बहुतेक महिलांना वयाच्या ४० व्या वर्षापूर्वी रजोनिवृत्तीबद्दल माहिती नसते. ८० टक्क्यांपेक्षा जास्त महिलांना शाळेत रजोनिवृत्तीबद्दल कोणतेही शिक्षण मिळालेले नसते. आरोग्य साक्षरतेची सर्वात कमी पातळी बहुतेकदा शारीरिक हालचालींशी कार्याशी संबंधित असते. अनेक प्रदेशांमध्ये महिलांच्या आरोग्याबद्दल चर्चा अजूनही निषिद्ध मानली जाते. ज्यामुळे महिलांना योग्य वैद्यकीय सल्ला घेण्यापासून रोखले जाते. सुमारे ७१ टक्के महिलांचा असा विश्वास आहे की, शाळा किंवा कामाच्या ठिकाणी मासिक पाळीबद्दल बोलणे निषिद्ध आहे.

जगभरातील तीनपैकी एक महिला कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराला बळी पडते. युरोप आणि अमेरिकेतील ५० टक्क्यांपेक्षा जास्त महिलांचे वजन जास्त आहे. भारतात स्थूल महिलांचे प्रमाण दररोज बाढत आहे; पण बहुतेकदा त्या त्यावर काहीही उपाययोजना करत नाहीत. रजोनिवृत्तीचा अनुभव घेणाऱ्या ५५ टक्के महिला त्यांच्या लक्षणांवर उपचार करण्यासाठी कोणतेही पाऊल उचलत नाहीत. कमी संसाधन असलेल्या बाताबरणात ४६ टक्के महिलांना कुशल प्रसूती सेवकांची सुविधा उपलब्ध नाही. ज्या महिला त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यात अधिकाधिक सक्रिय होत आहेत, त्यांना लक्षणे ओळखण्यापासून ते स्वतःच्या शरीराला समजून घेण्यापर्यंत प्रजनन, हार्मोनल आणि मानसिक आरोग्याबाचत व्यापक पुराव्याचर आधारित शिक्षणाची एक मोठी अपूर्ण गरज आहे. त्यासाठी कुणीही प्रयत्न करत नाही.

ताज्या बातम्या

आमदार-खासदारांची वेगळी भूमिका म्हणजेच….; सर्वोच्च न्यायालयात शिंदेंच्या वकिलांचा जोरदार प्रतिवाद

0
मुंबई । Mumbai सत्तासंघर्षाच्या नाट्यामध्ये 'शिवसेना' हे नाव आणि 'धनुष्यबाण' हे चिन्ह कुणाचे, यावरून सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेला न्यायालयीन संग्राम आता अत्यंत निर्णायक वळणावर आला...