पेठ | वार्ताहर | Peth
हरसुल सिमेपासून, सुरगाणा ते दिंडोरी सिमेपर्यंतच्या भागात गेल्या दोन दिवसांपासून जमीनीतून हादरे व आवाज येत असल्याने नागरीक (Citizen) भयभीत झाले आहेत. स्फोट सदृश्य आवाज नक्की कशामुळे व भूकंपाचा धक्का (Earthquake Shock) कशामुळे जाणवतो याबाबत खात्रीशीर मोजमाप नसल्याने सर्वत्र नागरीक तर्कवितर्क लढवत आहेत.
मेरी भूकंपमापन यंत्रावर (Meri Seismometer) या छोट्या धक्क्याची नोंद होत नसल्याने भूकंप व धक्क्याच्या प्रकाराचे गूढ वाढत असल्याने महसूल प्रशासनाकडून नागरीकांना सावध राहण्याचा इशारा देण्यापलीकडे दुसरा कुठलाही पर्याय नसल्याची प्रतिक्रिया तहसिलदार श्रीमती गांगुर्डे यांनी दिली.
पेठ तालुक्यातील (Peth Taluka) मानकापूर, आडगाव भुवन धानपाडा आदी गावांमध्ये मंगळवारी रात्री ८.३० व ९.२७ वाजता धक्के जाणवल्याचे नागरिकांनी सांगितले. या भागात अचानक धक्के जाणवू लागल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले तर जमिनीखाली सतत होणात्या हालचालीमुळे हे धक्के जाणवत असल्याचं भूगर्भ शास्त्रज्ञांनी म्हटल्याचे
समोर आले आहे.
तसेच पेठ तालुक्यातील आडगाव, पळशी खु, कडवईपाडा, घनशेत, धानपाडा यासह नराशी परिसरात (Area) दोन दिवसापासून जमीनीतून आवाज येत असल्याचे सांगितले जाते. तर मंगळवारी अनेक ठिकाणी जमीन थरथरल्याचे जाणवले. हा भूकंपसदृश्य धक्का असून नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी व अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन प्रशासनातर्फे (Administration) करण्यात आले आहे.