Thursday, March 13, 2025
HomeनाशिकNashik News : ग्रामपंचायत निवडणुकांचा जानेवारीअखेर बिगुल

Nashik News : ग्रामपंचायत निवडणुकांचा जानेवारीअखेर बिगुल

१९३ सरपंच आरक्षणाचा २१ ला निकाल

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या (Loksabha and Vidhansabha Election) पाठोपाठ स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांची तयारी गतिमान झाली आहे. जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधील १९३ ग्रामपंचायतींच्या (Gram Panchayats) डिसेंबरअखेरीस मुदती संपुष्टात आल्याने २१ जानेवारीनंतर या सर्व ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकांचा बिगुल वाजण्याची शक्यता दिसून येत आहे. त्यादृष्टीने प्रशासनाची तयारी गतिमान झाल्याचे चित्र आहे.

- Advertisement -

सरपंच आरक्षणाच्या सोडती जाहीर करण्यासाठी २१ जानेवारीला बैठक घेण्याचे आदेश राज्य सरकारने (State Government) काढल्याने जानेवारी अखेर पर्यंत निवडणूकांचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे.मागील वर्ष (२०२४) हे निवडणूक वर्ष असल्याचे दिसून आले. राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्या. त्या पाठोपाठ आता राजकीय पक्षांना स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत.

जिल्ह्यात १३ तालुक्यांतील १९३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका २०२५ या वर्षाच्या पहिल्या सत्रातच घेतल्या जाणार असल्याचे दिसून येत आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार जिल्हाधिकारी कार्यालयातील (Collector’s office) ग्रामपंचायत विभागाने या गावांमध्ये पंचवार्षिक निवडणुकांच्या अनुषंगाने प्रभागरचनांची कार्यवाही यापूर्वीच पूर्ण केलेली आहे. मात्र, गावनिहाय सरपंच सोडतीचा मुद्दा प्रलंबित राहिल्याने आयोगाची निवडणुकीची तयारी खोळंबली होती.प्रत्यक्षात गावपातळीवर इच्छुकांनी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन तयारीला प्रारंभ केला असल्याचे चित्र आहे.

सरपंच आरक्षण वाटप प्रलंबित

शासन पातळीवरुन राज्यातील ३४ जिल्ह्यांमधील पेसा क्षेत्र वगळता खुल्या वर्गातील १ हजार ४५२ ग्रामपंचायतींमध्ये सरपंच आरक्षणाचे वाटप केले आहे. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) १९६ पैकी पेसा क्षेत्र वगळता १०६ ग्रामपंचायतींकरीता आरक्षणाचे वाटप केले आहे. त्यामध्ये अनुसूचित जातीसाठी ८, अनुसूचित जमातीच्या १३, ओबीसींसाठी २९ जागा राखीव असतील. तर ५६ सरपंचांच्या जागा या खुल्या प्रवर्गात असतील. कोणत्या गावांमध्ये सरपंचाची पदे राखीव होणार अन् कुठली पदे खुल्या प्रवर्गासाठी सुटणार याबाबतचा निर्णय घेण्यासाठी येत्या २१ जानेवारीला होणाऱ्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. शासनाने त्यासंदर्भात अध्यादेश जारी केला असल्याने जानेवारी अखेरपर्यंत निवडणुकांचा मुहूर्त जाहीर होण्याची शक्यता आहे.

९ ग्रामपंचायतींसाठी लवकरच प्रभागरचना

जिल्ह्यातील ९ ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचना जाहीर करण्यासाठी मागविलेल्या हरकतींवर हरकत घेण्यासाठी दिलेला कालावधी सोमवारी (दि.६) संपला. मात्र, या कालावधीत सावरपाडा व्यतिरिक्त कोणत्याही ग्रामपंचायतील हरकत दाखल झालेली नसल्याने लवकरच प्रभागरचना जाहीर करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. यामध्ये त्र्यंबकमधील खरशेत, बागलाणमधील अलियाबाद, देवळा येथील वरखंडी, मालेगावमधील सावतावाडी, वडनेर, काष्टी तसेच दिंडोरी येथील सावरपाडा, ननाशी अणि खळगाव येथील ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

मुदत संपलेल्या ग्रामपंचायती

इगतपुरी ६५
निफाड ३२
बागलाण २९
त्र्यंबकेश्वर १७
कळवण १४
मालेगाव ०९
नांदगाव ०८
येवला ०८
नाशिक ०७
चांदवड ०१
दिंडोरी ०१
देवळा ०१
पेठ ०१
एकूण १९३
YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...