Wednesday, May 6, 2026
HomeनाशिकNashik News : दिंडोरी तालुक्यात विजेचा लपंडाव; शेतकरी संतप्त

Nashik News : दिंडोरी तालुक्यात विजेचा लपंडाव; शेतकरी संतप्त

ओझे l विलास ढाकणे | Oze

गेल्या ८ ते १० दिवसापासून दिंडोरी तालुक्यात (Dindori Taluka) विजेचा लपंडाव सुरु असून, या अनियमित वीज पुरवठयामुळे शेतकरी (Farmer) वर्गामध्ये संताप व्यक्त केला जात आहे. महावितरण कंपनीने या संदर्भात त्वरित दखल न घेतल्यास एखादे आंदोलन केले जाऊ शकते अशी चर्चा शेतकरी वर्गातून पुढे येत आहे.

- Advertisement -

नव्या वेळापत्रकानुसार तालुक्यात अनेक ठिकाणी चार दिवस दिवसाचा थ्री फेज विजपुरवठा (Electricity) केला जातो. मात्र, त्यात शनिवार येत असल्यामुळे महावितरण कंपनी अनेक वेळा त्यादिवशी दुरुस्तीचे काम काढते. त्यामुळे शेतकरी वर्गाला दिवसाचा थ्री फेज विजपुरवठा मिळत नाही यामुळे शेतकरी वर्गाचा दिवस वाया जातो. त्याचप्रमाणे गेल्या १० ते १२ दिवसापासून दिवसाच्या थ्री फेज वीज पुरवठ्यामध्ये वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण जास्त वाढल्यामुळे कृषीपंप जळण्याचे प्रमांणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यांमुळे शेतकरी वर्गाचा खोळंबा तर होतोच मात्र आर्थिक तोटाही सहन करावा लागत आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांच्या मते कृषीपंपानां कमी दाबाने विजपुरवठा होत असल्याने केबल व स्टार्टर जळण्याचे प्रमाण वाढले आहे. यासाठी महावितरण कंपनीने यातून मार्ग काढण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

दिंडोरी तालुक्यात कादवा, कोलवण नदी काठावरील परिसरामध्ये बारामाही विविध प्रकारच्या भाजीपाला पिकांची लागवड केली जाते. या भाजीपाला पिकांना मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. मात्र, या खंडित वीज पुरवठ्यामुळे पिके धोक्यात आली आहे. तसेच संपूर्ण दिंडोरी तालुक्यामध्ये सध्या द्राक्षबागे खरड छाटणीला सुरुवात झाली आहे. मागील वर्षी अतिवृष्टीमुळे द्राक्षबागा उभ्या होत्या. मात्र, या खंडीत वीज पुरवठ्यामुळे द्राक्षबागायतदार वर्गामध्येही कमालीची नाराजी पसरली आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण तालुक्यातील ऊसतोड संपली असल्यामुळे सर्व ठिकाणी ऊसाच्या मशागती वेग आला आहे.

दरम्यान, चालू वर्षी अतिपावसाने (Heavy Rain) ऊसाच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाल्याचे दिसून आले. टनेज खूप कमी मिळाल्याने शेतकरी ऊसशेतीकडे जास्त लक्ष देत आहे. परंतु अशा खंडित वीजपुरवठ्यामुळे ऊस शेतीवर परिणाम होत आहे. सध्या उन्हाळ्याचे चटके जोरदार जाणवत असल्यामुळे सर्वच पिकांना पाण्याची जास्त आवश्यकता निर्माण झाली आहे. मात्र, या खंडीत वीज पुरवठ्यामुळे शेतकरी वर्गामध्ये संताप व्यक्तत केला जात आहे. यासाठी महावितरण कंपनीने त्वरित सुधारणा करणे आवश्यक असल्याचे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे.

सध्या थ्री फेज वीज पुरवठामध्ये सतत खंड पडत असल्यामुळे कृषीपंप, केबल, स्टार्टर जळण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचप्रमाणे पिकांना पाणी देता येत नाही. वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. महावितरण कंपनीने सर्वच ठिकाणच्या उपकेंद्रांमध्ये उपाययोजना करून शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा द्यावा, अन्यथा शेतकरी रस्त्यावर येतील.

जयदिप देशमुख, शेतकरी करंजवण

ताज्या बातम्या

Ahilyanagar : झेडपी प्रशासन नव्याने बदल्यांचे वेळापत्रक तयार करणार !

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जनगणनेच्या कामासाठी यंदा बहुतांश जिल्हा परिषद कर्मचार्‍यांना जबाबदारी दिल्याने त्यांच्या बदली प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे. या वर्षी सरकारच्या सुचनेनूसार जनगणनेचे कामे...