नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नववर्ष स्वागतासाठी नाशिककरांसह (Nashik) बाहेरून येणाऱ्यांनी जोरदार तयारी केली आहे. त्यामुळे पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागानेही (Police Forced and Excise Department) बंदोबस्ताचे नियोजन पूर्ण केले आहे. मंगळवारी (दि. ३१) शहरासह जिल्ह्यात पहाटे पाचपर्यंत बारमध्ये ‘मैफल’ सगणार असून, देशी व बिदेशी दारू विक्री पहाटे एकपर्यंत सुरू राहणार आहे. काही उत्साही आजपासूनच ‘सेलिब्रेशन सुरु करणार असल्याने शहरासह जिल्ह्यात नाकाबंदीसह बंदोबस्त तैनात झाला आहे.
शहरासह जिल्ह्यात (City and District) नियमांनुसार ‘सेलिब्रेशन’ ची परवानगी देण्याबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) व ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी सूचना करून अमली पदार्थांवर करडी नजर ठेवण्याचे आदेश पथकांना दिले आहेत. शहरातील ‘सीसीटीव्हीं’ मार्फत नियंत्रण कक्षातून सेलिब्रेशनवर पथकांचा ‘बाँच’ राहणार आहे. यासह मद्यपी, टवाळखोर, चिंगाणा करणाऱ्यांना ताब्यात घेतल्यावर संबंधितांवर प्रतिबंधात्मक कारवाईअंतर्गत गुन्हे नोंद केले जाणार आहेत.
दरम्यान, ३१ डिसेंबर रोजी मंगळवारी असून मांसाहार करणा-यांसह मद्यपींचे ‘सेलिब्रेशन’ शनिवारी (दि. २८) किंवा रविवारी (दि.२९) पासूनच सुरू होऊ शकते. त्यामुळे आजपासून शहरासह जिल्हाभरातनाकाबंदी करण्यात येणार आहे. श्वान पथकांनाही ‘ओल्या पाट्यौं’च्या ठिकाणी पाचारण करण्यात येणार आहे. नववर्ष स्वागतासाठी (Welcome the New Year) इगतपुरी,त्र्यंबकेश्वर, चांदशीसह ग्रामीण हद्दीतील रिसॉर्ट, हॉटेल्स व फार्म हाऊस बुकिंग करण्यात आली आहे. त्यामुळे साध्या वेशातील पथकेही नजर ठेऊन असतील.
‘उत्पादन शुल्क’ विभागाचे नियोजन…
१) रिसॉर्ट, फार्म हाऊस, बार-हॉटेलना नोटिसा
२) परवाना असलेल्या व्यक्तींनाच मद्य देण्याची सूचना
३) जिल्ह्याच्या सीमेलगत भरारी पथके तैनात
४) बेकायदेशीर मद्य वाहतूक, विक्री रोखणार
५) जिल्हाभरात नाकाबंदी, बार हॉटेल वाइन शॉपची तपासणी
असा मिळवा परवाना
१) मद्यविक्री दुकानातून मिळतो एक दिवसाचा परवाना
२) मद्य खरेदीवेळी करावी परवान्यासंदर्भात मागणी
३) त्याचे शुल्क भरून परखान्याची पावती घ्यावी
४) ई-स्वरूपातही मिळविता येईल परवाना
५) पोर्टलवर करावा परवान्यासाठी अर्ज
मुद्दे
विदेशी मद्य विक्री पहाटे एकपर्यंत
बिअरबार: पहाटे पाचपर्यंत
परवाना कक्ष शहरात पहाटे दीड ते पाच, ग्रामीणमध्ये रात्री साडेअकरा ते पहाटे पाच
३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलीस ठाण्यांसह वाहतूक व गुन्हे शोध पथकांचा बंदोबस्त तैनात असेल, वीकेंडसह मंगळवारी नाकाबंदी करण्यात येईल, चौकाचौकांत वाहनचालकांची तपासणी करुन मद्यपींसह नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करु.
प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त, गुन्हे