Monday, July 27, 2026
Homeनाशिकत्र्यंबकेश्वर पट्ट्यात शेतकऱ्यांना 'दुहेरी मार'; डहाणू-नाशिक रेल्वेमार्गाच्या प्रस्तावाने चिंता अन् अस्वस्थता

त्र्यंबकेश्वर पट्ट्यात शेतकऱ्यांना ‘दुहेरी मार’; डहाणू-नाशिक रेल्वेमार्गाच्या प्रस्तावाने चिंता अन् अस्वस्थता

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यालगतच्या (Nashik-Trimbakeshwar Road) ५० मीटर निर्बंध क्षेत्रातील बांधकामे अतिक्रमण ठरवत एनएमआरडीएतर्फे (नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) कारवाईला गती देण्यात आली आहे. या कारवाईमुळे आधीच अस्वस्थ झालेले शेतकरी (Farmer) बांधव आता डहाणू-नाशिक रेल्वेमार्गाच्या प्रस्तावामुळे (Dahanu-Nashik Railway Line) आणखी चिंतेत सापडले आहेत.

- Advertisement -

अलीकडेच रेल्वे मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी नाशिकला (Nashik) येऊन या प्रकल्पाब्राचत फेरसर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रस्तावानुसार हा मार्गरानवड नाशिक-त्र्यंबकेश्वर डहाणू अला केला जाण्याची शक्यता असून, त्याचे नियोजन निश्चित झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर शेतीजमिनी (Agricultural Land) त्यात अडकण्याचा धोका आहे.

दरम्यान, नाशिक-त्र्यंबकेश्वर डहाणू हा मार्ग प्रत्यक्षात कुठून जाणार? नाशिक शहराला (Nashik City) तो बाहेरील वळणाने टाळून जाईल की गावखेडयातूनच सरळ नेला जाईल? तसेच हा मार्ग मुख्य रेल्वे नेटवर्कला कुठे जोडला जाणार? याबाबत कोणतीही अधिकृत स्पष्टता नसल्याने संभ्रम आहे.

विकास की भूमिहीनता, शेतकऱ्यांपुढे प्रश्न

एकीकडे एनएमआरडीएकडून नियमबाहा बांधकामे’ या नावाखाली कारवाई, तर दुसरीकडे नव्या रेल्वेमार्गासाठी संभाव्य भूमी संपादन या कचाट्यात शेतकरी सापडले आहेत. भूमिहीन होण्याचा मार्ग प्रशासनच आखून देत आहे, अशी भावना स्थानिक नागरिकांत रुजताना दिसत आहे.

नागरिकांमध्ये संभ्रम : प्रशासनही शांत

अद्याप सीमांकन किंवा अधिकृत अधिसूचना जाहीर केलेली नसली तरी फक्त फेरसर्वेक्षणाच्या हालचालीनेच परिसरातील शेतकरी बांधवांमध्ये चिंता दाटली आहे. एनएमआरडीएच्या कारवाईत शेतकऱ्यांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. पुनर्वसन व भरपाईचा मुद्दाही पूर्णपणे अनिश्चित असल्याचे दिसून येत आहे.

बंदराशी थेट संपर्काचा हेतू

या रेल्वेमार्गाचा प्रमुख उद्देश वाढवण बंदरापर्यंत थेट मालवाहतूक संपर्क निर्माण करणे अस्त आहे. नाशिकमधील ड्रायपोर्टपासून बंदरापर्यंत वेगवान वाहतु‌कीचे जाळे तयार करणे ही योजना असली तरी या रेल्वेमार्गाचा प्रस्ताव गेल्या अनेक वर्षांपासून मिजत पडलेला होता. मात्र नव्याने सुरू झालेल्या या प्रक्रियेचा सर्वात गंभीर परिणाम गिरणारे, रानवड, अंबड, त्र्यंबक या भागातील शेतकऱ्यांच्या जमिनींवर होणार असल्याची भीती वाढू लागली आहे.

ताज्या बातम्या

Bhandardara : निळवंडेतूनही विसर्ग वाढविला; लाभक्षेत्रात समाधान

0
अकोले | Akole उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याच्या दृष्टीने भंडारदरा खालोखाल महत्वपूर्ण असणारे निळवंडे धरणही शुक्रवारी भरले. पाण्याची आवक वाढतच असल्याने अखेर निळवंडे धरणातील पाणीसाठा नियंत्रणासाठी काल...