Friday, April 25, 2025
Homeक्राईमNashik News : इन्स्टाग्रामच्या पोस्टवरून मित्रांमध्ये शाब्दिक वाद; एका तरुणावर हल्ला, पाच...

Nashik News : इन्स्टाग्रामच्या पोस्टवरून मित्रांमध्ये शाब्दिक वाद; एका तरुणावर हल्ला, पाच जण ताब्यात

पिंपळगाव बसवंत | वार्ताहर | Pimpalgaon Baswant

पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon Baswant) येथे इन्स्टाग्रामच्या पोस्टवरून (Instagram Post) दोन मित्रांमध्ये शाब्दिक वादावरून १० ते १५ तरुणांनी एकत्र येत एका तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेत हल्ला करणाऱ्या ५ तरुणांवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक (Arrested) करण्यात आली आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ पिंपळगाव सकल समाजाच्या वतीने कडकडीत बंद ठेवत पिंपळगाव पोलीस ठाण्यात हजारोंचा मोर्चा काढत निवेदन देण्यात आले.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळगाव शहरातील चिंचखेड रोड येथे स्थायिक असलेल्या आर्यन रवि बिगानीया या तरुणाने (Youth) शुक्रवार (दि.६) रोजी आपल्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर शोर्य दिनानिमित्तने एक पोस्ट प्रसिद्ध केली.ती पोस्ट आर्यन याचा मित्र असलेला मिजान शहा याने बघितल्यानंतर आर्यन याचा भाऊ असलेला गणेश जाधव यास या पोस्टचा स्क्रीनशॉट पाठवला व बोलला की असा जातीवाद करून काय भेटते.या गोष्टीचा गणेश याने आर्यन यास स्क्रीनशॉट पाठवला असता आर्यन याने मिजान यास याबाबत विचारणा केली असता मिजानने आर्यनला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी (Death Threats) दिली.

हे देखील वाचा : Nashik Crime : सराईताची हत्या; पाच जण अटकेत

त्यानंतर शनिवार (दि.७) रोजी दुपारी ३ च्या सुमारास पिंपळगाव कन्या विद्यालयाच्या परिसरात आर्यन यास मिजान व त्याच्या मित्रांनी दगड व लाकडी दांड्याच्या साहाय्याने मारहाण केली.या मारहाणीत आर्यनला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून हा हल्ला करणाऱ्या मिजान शहा, आयान शहा, आवेश शहा, सोनू, फइम शेख यांच्यासह १५ तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी (Police) पाच जणांना ताब्यात घेतले आहे.

तर इतर हल्लेखोरांचा तपास पोलीस प्रशासन करत असून पुढील तपास ग्रामीण पोलीस उपअधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी हे करत आहे. यावेळी मोर्चाच्या ठिकाणी मोठा फौज फाटा शहरात तैनात करण्यात आला होता. आज रविवारी आठवडे बाजार असल्याने दुपारनंतर दुकाने (Shop) उघडण्यात आली. यावेळी मोर्चाचे स्वरूप मोठे होते. मात्र, अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चा पोलीस ठाण्यात जमा झाला होता.

हे देखील वाचा : Nashik Crime : चेनस्नॅचिंग करणारा सराईत गुन्हेगार ताब्यात

दरम्यान, भाजपच्या नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे (MLA Devyani Pharande) यांनी या हल्ल्याचा पिंपळगाव पोलीस ठाण्यात उपस्थित राहून जाहीर निषेध केला.तर हा हल्ला झाल्याने पिंपळगावला सकल समाजाच्या वतीने कडकडीत बंद पाळत निफाड फाटा ते पोलीस ठाण्यापर्यंत मोर्चा काढत पोलीस प्रशासनास निवेदन देण्यात आले.यावेळी पिंपळगाव शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...