Friday, May 29, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik News : कर्मवीरांच्या त्यागातून उभ्या राहिलेल्या 'निसाका'च्या संघर्षासाठी तयार - अनिल...

Nashik News : कर्मवीरांच्या त्यागातून उभ्या राहिलेल्या ‘निसाका’च्या संघर्षासाठी तयार – अनिल कदम

निफाड | प्रतिनिधी | Niphad

- Advertisement -

तालुक्यातील बहिणींच्या तोंडचा घास हिरावत ऊस उत्पादकांना देशोधडीला व कामगारांच्या (Worker) कुटुंबातील महिला निदंनी, खुरपणीसाठी जात आहे. ज्या महिला (Woman) घराबाहेर पडल्या नाहीत, त्या कामगारांच्या कुटुंबातील बलिदानाची शपथ तर वर्षभर ऊसाला पाणी घालून ऊस तोडणीसाठी विनंती करणाऱ्या ऊस उत्पादकांच्या त्यागाला स्मरून या कर्मवीरांच्या त्यागातून उभ्या राहिलेल्या निसाका (Nisaka) व रासाकाच्या संघर्षासाठी तयार आहे, असे प्रतिपादन निफाडचे माजी आमदार अनिल कदम (Anil Kadam) यांनी निसाका बचाव संघर्ष समिती ऊस उत्पादक सभासद व कामगारांच्या वतीने विराट मोर्चाप्रसंगी संबोधित करताना आपल्या भाषणात केले.

निसाकाची १२७ एकर जमिन (Land) व अन्य मालमत्तेची विक्री प्रक्रिया त्वरित थांबवावी. कामगारांची थकीत देणी देण्यात यावी. मशिनरी दुरुस्तीच्या नावाखाली विक्री केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या मौल्यवान सामुग्रीची चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे,या प्रमुख मागण्यासाठी आज (मंगळवारी) सकाळी ११ वाजता माजी आमदार अनिल कदम यांच्या नेतृत्वाखाली निसाका संघर्ष समिती व सभासद, कामगारांच्या वतीने निफाड तहसील व प्रांताधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.

यावेळी तहसीलदार विशाल नाईकवाडे (Vishal Naikwade) यांना निवेदन देण्यात आले. निसाकाची विक्री रद्द करा, निसाका आमच्या हक्काचा,नाही कुणाच्या बापाचा… निफाड कारखान्याचे कोट्यवधी रुपयांचे भंगार विकणाऱ्यावर गुन्हे दाखल करा…,सभासद व कामगार एकजुटीचा विजय असो… अशा घोषणा देत सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी धडक मोर्चात एल्गार पुकारला होता.

दरम्यान, याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख खंडू बोडके, माजी जि.प सदस्य दीपक शिरसाठ, शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे, स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष निवृत्ती गारे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दिगंबर गिते, पिंपळगाव बाजार समिती संचालक गोकुळ गीते, युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम रंधवे, कामगार युनियन कार्याध्यक्ष सोमनाथ गडाख, सरचिटणीस बी.जी पाटील, सुनील कदम, प्रकाश अडसरे संजय पाटोळे, संदीप टर्ले, बाळासाहेब सरोदे, सचिन वाघ, प्रभाकर रायते, बाळासाहेब जाधव, रामराव मोरे, यांच्यासह आदी निसाका सभासद, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निसाका मोर्चाच्या पूर्वसंध्येला आमदारांनी चुकीची माहिती देऊन दिशाभूल करत राजकीय वळण दिले. मात्र सभासद कामगारांनी एकजुटीने मोर्चात उत्स्फूर्त सहभाग घेत प्रांत कार्यालयावर धडक दिली. त्यामुळे यापुढे तालुक्याच्या लोकप्रतिनिधीनी जनतेची दिशाभूल थांबवून निसाका विक्री रद्द करून कार्यान्वित होण्यासाठी प्रयत्न करावेत, अन्यथा जनता त्यांना माफ करणार नाही. सभासद व कामगारांच्या बळावर निसाकाचा लढा यापुढेही सुरूच राहणार आहे.

खंडू बोडके,शिवसेना निफाड तालुकाप्रमुख

सभासद आणि कामगार यांच्या भावना विचारता घेता. तुमच्या मागण्या आणि भावना शासनापर्यंत पोचविण्याचे काम करण्यात येईल.निसाका प्रश्नी प्रशासनाची सहकार्याची भूमिका राहील.

विशाल नाईकवाडे, तहसीलदार, निफाड

ताज्या बातम्या

Ahilyanagar : एसआयआर मोहिमेची पूर्व तयारी सुरू

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar मतदार याद्या अचूक आणि बीएलओंकडून गृहभेटी पारदर्शक करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून एसआयआर मोहीम राबवली जाणार आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाकडून बारा विधानसभा मतदारसंघांत...