येवला | प्रतिनिधी | Yeola
मकर संक्रांतीच्या (Makar Sankranti) निमित्ताने यांना शहरांमध्ये विशेष पतंग उत्सवाचे आयोजन करण्यात येते. माजी खासदार समीर भुजबळ (Former MP Sameer Bhujbal) यांनी पत्नी डॉ.शेफाली भुजबळ यांच्या समवेत पतंग उत्सवात हजेरी लावत पतंग उत्सवाचा आनंद लुटला. यावेळी समीर भुजबळ यांनी उपस्थित पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांना मकर संक्रांतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
माजी खासदार समीर भुजबळ यांनी पतंग (Kite) उत्सवाच्या निमित्ताने येवला विधानसभा उपाध्यक्ष दत्ता निकम, राजेश भांडगे, शिवसेना शहराध्यक्ष अतुल घटे, विशाल परदेशी, मलिक मेंबर, यांच्याकडे भेटी देत पतंग उत्सवाचा आनंद लुटला. यावेळी पतंग उडवीत समीर भुजबळ यांनी अनेक पतंग देखील कापले.
यावेळी डॉ.शेफाली भुजबळ, माजी नगराध्यक्ष राजश्री पहिलवान, शहराध्यक्ष दिपक लोणारी, विधानसभा उपाध्यक्ष दत्ता निकम, राजेश भांडगे, मकरंद सोनवणे, समाधान जेजुरकर,सचिन कळमकर, मुश्ताक शेख, मलिक मेंबर, संतोष खैरनार, भाऊसाहेब धनवटे, सुनील पैठणकर, समाधान जेजुरकर, सुभाष गांगुर्डे, सचिन सोनवणे, भूषण लाघवे, सुमित थोरात, गोटू मांजरे, विशाल परदेशी, समाधान पगारे, महेश गादेकर, संतोष राऊळ, प्रीतम शहारे, विमल शहा,गणेश गवळी, राकेश कुंभारे, श्रीकांत वाकचौरे, सौरव सोनवणे आदी उपस्थित होते.
येवला शिवसृष्टी प्रकल्पाच्या कामाची केली पाहणी
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या विशेष प्रयत्नांतून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याच्या संकल्पनेवर आधारित येवला शहरात भव्य दिव्य शिवसृष्टी प्रकल्प साकारण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या सुरू असलेल्या कामाची माजी खासदार समीर भुजबळ यांनी पाहणी केली.यावेळी आर्की.सारंग पाटील, कंत्राटदार पंकज काळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मांजामुळे जखमी झालेल्या रुग्णाची घेतली भेट
पारेगाव तालुका येवला येथील दत्तात्रेय जेजुरकर यांना नायलॉन मांजामुळे गळ्याला गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर सोनवणे हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहे. माजी खासदार समीर भुजबळ यांनी जेजुरकर यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली तब्येतीची विचारपूस केली. यावेळी समीर भुजबळ यांनी सोनवणे हॉस्पिटलचे डॉ.आर एम सोनवणे, डॉ.तेजस सोनवणे, डॉ.करिश्मा सोनवणे यांच्याशी चर्चा करत रुग्णाच्या तब्येतीची माहिती घेतली.