Monday, October 14, 2024
HomeनाशिकNashik News : गणेश विसर्जन आणि ईद-ए-मिलादचा उत्सव; मिरवणूक मार्गावर असणार 'इतक्या'...

Nashik News : गणेश विसर्जन आणि ईद-ए-मिलादचा उत्सव; मिरवणूक मार्गावर असणार ‘इतक्या’ सीसीटीव्हींची करडी नजर

५० ड्रोनही झेपावणार

नाशिक | Nashik

शहरातील कायदा व सुव्यवस्था चोख ठेवण्यासाठी पोलिसांनी (Police) चोख बंदोबस्त नेमल्यानंतर आता गणेशाच्या विसर्जन (Ganesh Visarjan) मिरवणुकीसह ईद-ए-मिलादच्या (Eid-e-Milad) जुलूसच्या बंदोबस्ताचे नियोजन अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. मिरवणुकीसह जुलूस मार्गावर पोलिसांनी दोनशेपेक्षा जास्त सीसीटीव्ही व साठपेक्षा जास्त ड्रोन कार्यान्वित केले आहेत. विशेष म्हणजे, मिरवणूक व जुलूसचे ‘लाइव्ह फीड’ आयुक्तालयात दिसेल, त्यामुळे मंडळांच्या वेळेच्या नोंदी ठेवणे शक्य होणार आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Crime News : अवैध गर्भपात प्रकरण; सत्तर वर्षीय डॉक्टरची सखोल चौकशी

अनंत चतुर्दशीनिमित्त (दि. १७) सकाळी ११ वाजता गणेश विसर्जन मुख्य मिरवणुकीला (Processions) भद्रकालीतल्या वाकडी बारव येथून प्रारंभ होणार आहे. त्यासाठी पोलिस उपायुक्त परिमंडळ एक कार्यालयाने बंदोबस्ताची आखणी केली आहे. विशेष शाखेमार्फतही अतिरिक्त बंदोबस्ताचे नियोजन सुरू आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरवणुकीत राजकीय शक्तिप्रदर्शन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मिरवणुकीच्या दोन्ही बाजूने पोलिसांचे बॅरीकेडिंग असेल. यासह एकाच ठिकाणी रेंगाळणाऱ्या मंडळांवर लक्ष ठेवण्यासाठी मिरवणुकीच्या सुरूवातीपासून ‘ड्रोन
शूटिंग’ करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे.

हे देखील वाचा : Nashik Traffic Route Change : सोमवारपर्यंत अनेक मार्गांत बदल; कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना

तसेच, मिरवणूक मार्गावर दोनशेपेक्षा जास्त सीसीटीव्ही (CCTV) बसविण्यात आले आहेत. यासह सोमवारी (दि. १६) ईद-ए-मिलादनिमित्त भद्रकालीतून जुलूस निघणार आहे. त्याठिकाणीही सीसीटीव्हीसह ड्रोनचा वापर होईल. जुलूस व गणेश विसर्जन मिरवणुकीचे ‘लाइव्ह फीड’ आयुक्तालयातील ‘कमांड कंट्रोल’ रूमममध्ये देण्यात येईल. तेथून गर्दी नियंत्रणासह प्रत्येक ठिकाणच्या हालचालींवर नजर ठेवण्यात येईल. यासह लेझरला मनाई असून नियम मोडणाऱ्यांविरुद्ध कारवाई करणार असल्याचे आयुक्तालयाने म्हटले आहे.

हे देखील वाचा : Nashik Crime News : जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांना अटक

पोलिसांचे नियोजन

  • साउंड सिस्टिम, वाद्यांचा आवाज मर्यादेत
  • प्रत्येक मंडळाजवळ ध्वनिमर्यादेची तपासणी
  • ढोलपथकांनाही वादक संख्येवरुन ताकीद
  • स्वागत कक्षातून सूचना व उद्घोषणा
  • हुल्लडबाजी करणान्यांवर त्वरित कारवाई
  • दामिनी, निर्भया, गुन्हे शाखांची अतिरिक्त पथके

गणेश विसर्जन मिरवणुकीसह ईद-ए-मिलादच्या जुलूसमध्ये सहभागी होणाऱ्या मंडळांना सूचना दिल्या आहेत. दोन्ही दिवस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षातून २४ तास निरीक्षण केले जाईल. यासह मिरवणूक व जुलूसचे सीसीटीव्ही, ड्रेनद्वारे चित्रीकरण होईल.

किरणकुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त, झोन-१

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या