वणी | वार्ताहर | Vani
टोमॅटोच्या शेतात (Tomato Crops) लावलेली गांजाची झाडे (Ganja Trees) वणी पोलिसांकडून जप्त करण्यात आली असून सुमारे ४२ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, भातोडे शिवारात रंगनाथ सोनू चव्हाण (वय ५१ रा.भातोडे ता.दिंडोरी जि. नाशिक) यांचे शेतात टोमॅटोचे पीक लावलेले होते. याच ठिकाणी जागोजागी गांजाची झाडे लावलेली होती, ही सर्व झाडे गांजा सदृश असून सहा प्लॅस्टिकच्या गोण्यात झाडासहीत भरली त्याचे वजन २०९.३२ किलोग्रॅम आहे. या गांजाची बाजारात सुमारे ४२ लाख रुपये किंमत असल्याचे सांगितले जाते.
दरम्यान, वणी पोलिसांनी (Vani Police) याबाबत गुन्हा नोंदविला असून गुंगीकारक औषध द्रव्य (Medicine) आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम सन १९८५ चे कलम २० व २२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वणी पोलीस करीत आहे.