Monday, October 5, 2026
HomeनाशिकNashik News : नाशकात जिलेटीन कांड्या आढळल्याने खळबळ; पोलीस घटनास्थळी दाखल

Nashik News : नाशकात जिलेटीन कांड्या आढळल्याने खळबळ; पोलीस घटनास्थळी दाखल

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सध्या शहरात गणेशोत्सवाची (Ganesh Festival) जोरदार धामधूम सुरु असून, भाविक देखावे पाहण्यासाठी रात्रीच्या सुमारास मोठी गर्दी करतांना दिसत आहेत. अशातच आता नंदिनी नदीच्या (Nandini River) किनारी स्फोटक समजल्या जाणाऱ्या जिलेटीनच्या काड्या सापडल्या आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील दादासाहेब गायकवाड सभागृहाच्या (Dadasaheb Gaikwad Hall) मागील बाजूस असणाऱ्या नंदिनी नदीच्या किनारी या जिलेटीनच्या कांड्या (Gelatin Sticks) संशयास्पदरित्या आढळून आल्या आहेत. या कांड्या वापरलेल्या असल्याने कोणताही धोका नाही.

दरम्यान, या कांड्या कुणी टाकल्या याची माहिती अद्याप मिळालेली नाही. तर घटनास्थळी बॉम्ब शोधक पथक दाखल झाले असून, संशयास्पद वस्तुंची तपासणी सुरू आहे. तसेच या कांड्यापासून कोणताही धोका नसल्याचा दावा पोलिसांकडून (Police) केला जात असून, पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : विखे-शिंदे-थोरात एकत्र बसणार!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महायुतीकडून पालकमंत्री राधाकृष्ण विखे व विधान परिषदेचे सभापती राम शिंदे तर महाविकास आघाडीकडून माजीमंत्री बाळासाहेब थोरात...