Saturday, July 4, 2026
HomeनाशिकVideo : …अखेर गोदावरी नदीपात्रातील कॉक्रीटीकरण हटविण्यास प्रारंभ

Video : …अखेर गोदावरी नदीपात्रातील कॉक्रीटीकरण हटविण्यास प्रारंभ

नाशिक । प्रतिनिधी

नाशिकची पावित्र्य नगरीची दक्षिण गंगा गोदावरी नदीतील जैवविविधतेचे पुनर्जीवन व्हावे आणि गंगा घाटातील सिमेंट कॉक्रीटीकरणाखाली दबले गेलेले 17 जीवंत कुंडाची पुनर्स्थापना व्हावी याकरिता गोदाप्रेमींनी सुरू केलेल्या लढ्याला यश आले आहे. अखेर स्मार्ट सिटीच्या कामांतर्गत गोदावरी नदीपात्रातील कॉक्रीटीकरण मुक्तीच्या कामास आज (दि.8)पासुन दुतोंड्या मारुती पासुन प्रारंभ झाल्याने गोदा व पर्यावरण प्रेमी समाधान व्यक्त केले आहे.

- Advertisement -

त्र्यंबकनगरीतून उगम पावलेल्या आणि नाशिक शहराला पवित्र्यनगरी अश जगभरात ओळख निर्माण करणार्‍या गंगा गोदावरी नदीतील वाढत्या प्रदुषणाला आळा घालण्यासाठी आणि गोदावरीला जैवविविधतेचे पुनरवैभव मिळवून देण्यासाठी गोदाप्रेमी व पर्यावरण प्रेमीची धडपड कायम सुरू आहे.

गोदावरी प्रदुषणमुक्तीसाठी न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर आता गोदा प्रदुषणमुक्तीच्या कामास प्रारंभ झाला आहे. तसाच प्रकारे गोदावरी नदीपात्रात पौराणिक ंसदर्भ असलेले व पेशवेकालीन जीवंत पाण्याचे कुंड सन 2003 – 04 यापुर्वी महापालिकेकडुन सुशोभिकरण कामासाठी पात्रात सिमेंट कॉक्रीटीकरण करुन गाडण्यात आली होती.

परिणामी नदीपात्रातील जैवविविधा नष्ट होऊन 17 कुंड अर्थात जीवंत झरे बंद झाल्याने नदीत पाणी राहत नसल्याने दुर्गंधी पसरत होती. याच पार्श्वभूमीवर गोदावरीला पुनरवैभव परत मिळविण्यासाठी गोदाप्रेमी देवांग जानी यांच्यासह सहकार्याने न्यायालयात धाव घेण्याबरोबरच शासनापर्यत पाठपुरावा करण्यात आला होता.

न्यायालयाने यासंदर्भात महापाकिला आयुक्तांना यासंदर्भात काही निर्देश दिले होते. यानुसार गोदापात्रातील लुप्त कुंडांचा तज्ञांकडुन सर्व्हे करण्यात आला होता. स्मार्ट सिटी अंतर्गत गोदा प्रकल्पांतर्गत पात्रातील कॉक्रीटीकरण काढण्याचे काम धरण्यात येऊन या कामाची निवीदा काढण्यात आली. त्यानुसार मागील वर्षात हे काम सुरू झाले असतांना काही नगरसेवकांनी यास विरोध केल्यानंतर काम थाबविण्यात आले होते.

मात्र, यानंतर जानी यांनी आपला पाठपुरावा सुरू ठेवला होता. अखेर लॉकडाऊनमुळे स्मार्ट सिटीच्या सर्वच कामांना ब्रेक लागल्याने कॉक्रीकरणुमुक्तीचे काम थांबले होते. आता स्मार्ट सिटीची कामे सुरू झाली असुन यानुसार गोदा प्रकल्पांतर्गत असलेल्या गोदा घाट सिमेंट कॉक्रीटीकरणमुक्तीच्या कामास आज पासुन रामकुंडालगत असलेल्या दुतोंड्या मारुती पासुन या कामास स्मार्ट सिटीकडुन सुरूवात करण्यात आली आहे.

हे काम आता गाडगे महाराज पुलापर्यत नदीच्या मधल्या भागातील संपुर्ण पायर्‍यांसह आतील कॉक्रीटीकरण काढण्यात येणार आहे. या टप्प्यातील कामात 17 पैकी अनामिका, दशाश्वमेघ, रामगया, पेशवे व खंडोबा कुंडातील जीवंत झरे पुन्हा सुरू होण्याची शक्यता असल्याने आणि नदीतील जैवविविधा पुनर्जीवीत होण्यास मदत होणार आहे. तसेच कॉक्रीटीकरणामुळे पुराच्या नैसर्गिक प्रवाहाला होणारा अडथळा दूर होऊन पुराची पातळी कमी होणार आहे.

ताज्या बातम्या

Maharashtra News : जमीन मोजणीची सव्वा लाखांहून अधिक प्रकरणे प्रलंबित; महसूल...

0
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai राज्यात जमीन मोजणीच्या संदर्भातील १ लाख २८ हजार २९० प्रकरणे प्रलंबित असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Minister Chandrashekhar Bawankule)...