Tuesday, October 6, 2026
HomeनाशिकNashik MC News : स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्ती प्रक्रियेला वेग; न्यायालयाने दिले 'हे'...

Nashik MC News : स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्ती प्रक्रियेला वेग; न्यायालयाने दिले ‘हे’ निर्देश

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महापालिका निवडणुकीनंतर (NMC Election) नऊ महिन्यांपासून रखडलेल्या दहा स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्ती प्रक्रियेला वेग आला आहे. उच्च न्यायालयाने (High Court) २९ सप्टेंबरला प्रक्रिया सहा आठवड्यांत पूर्ण करण्याचे आदेश दिल्यानंतर महापालिका प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत.

- Advertisement -

सोमवारी (दि.५) मनपा आयुक्त मनीषा खत्री (Manisha Khatri) यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक झाली. बैठकीत २१ ऑक्टोबरपर्यंत पक्षांनी त्यांच्या उमेदवारांची नावे सादर करावीत, अशी अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. नावे प्राप्त झाल्यानंतर संबंधित उमेदवारांचे अर्ज स्वीकारली जातील. त्यानंतर पात्रता, कागदपत्रे आणि निर्धारित निकषांची छाननी करून पात्र उमेदवारांची यादी निश्चित केली जाणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र उमेदवारांची नावे महासभेत जाहीर केली जाणार आहेत. त्यामुळे आता इच्छुकांच्या भेटीगाठी आणि पक्षांतर्गत हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.

या बैठकीला भाजपचे गटनेते अॅड. श्याम बडोदे, (शिवसेना शिंदे गट) गटनेते अजय बोरस्ते, (शिवसेना ठाकरे गट) गटनेते केशव पोरजे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या सीमा ठाकरे उपस्थित होते. महापालिकेतील पक्षीय संख्याबळानुसार दहा स्वीकृत नगरसेवकांच्या जागांपैकी भाजपला सहा, शिवसेना शिंदे गटाला दोन, तर शिवसेना (उबाठा) आणि काँग्रेस गटाला दोन जागा मिळणार आहे. या जागांसाठी पक्षांतर्गत इच्छुकांची संख्या मोठी असल्याने उमेदवार (Candidate) निवडीचे आव्हान पक्षांच्या गटनेत्यांसमोर आहे.

विषय समित्यांसाठीही फॉर्म्युला ठरला

नाशिक महापालिकेतील पाच विषय समित्यांच्या सभापती आणि उपसभापतीपदाच्या निवडीसाठी सत्ताधारी भाजपने फॉर्म्युला निश्चित केल्याची चर्चा आहे. पाचपैकी तीन समित्यांची सभापतीपदे भाजपकडे ठेवून दोन समित्यांची सभापतीपदे मित्रपक्षांना देण्याची रणनीती आखण्यात आल्याचे समजते.मात्र, उपसभापतीपदे भाजपकडेच ठेवण्याची भूमिका असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, सभापती व उपसभापतीपदासाठी मंगळवारी (दि.६) सकाळी ११ वाजता अर्ज दाखल केले जाणार आहेत. महापालिकेतील संख्याबळ पाहता पाचही समित्यांची सभापतीपदे भाजपकडे राहतील आणि निवड बिनविरोध होईल, अशी चर्चा होती.मात्र, सत्तेतील मित्रपक्षांना समित्यांमध्ये प्रतिनिधित्व देण्यासाठी दोन सभापतीपदे मित्रपक्षांना देण्याचा फॉर्म्युला ठरल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये शहर सुधार समिती आणि वैद्यकीय व आरोग्य समि ती यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. अंतिम चित्र अर्ज दाखल झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री

State Cabinet Meeting: पोलीस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांना साहसी कामगिरीसाठी ‘मुख्यमंत्री शौर्य...

0
मुंबई | Mumbaiराज्य मंत्रिमंडळ बैठकीत पोलीस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना साहसी कामगिरीसाठी "मुख्यमंत्री शौर्य पदक" मिळणार. कर्तव्य बजावताना जोखीम पत्करून केलेल्या कामगिरीसाठी रोख पन्नास हजार...