मालेगाव | प्रतिनिधी
सुताचे वाढलेले भाव तसेच कापडाला मीटरमागे एक ते दिड रूपये कमी भाव मिळत असल्याने यंत्रमाग धारकांचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान दर आठवड्यात होत आहे. बंद पडलेले कापडावरील प्रक्रिया उद्योग तसेब सुताच्या होत असलेल्या निर्यातीमुळे हे संकट उद्भवले आहे. केंद्र व राज्य शासनाचे या समस्येकडे लक्ष बेधण्यासाठी व आर्थिक मंदिव्या गर्तेत सापडलेला बंत्रमाग उद्योग बाचविण्यासाठी उद्या दि. ६ ऑक्टोबरपासून ७ दिवस संपुर्ण शहरातील ३ लाख २५ हजार यंत्रमाग बंद ठेवण्याचा निर्णय शहातील यंत्रमाग धारकांच्या बारा संघटनांनी घेतला आहे.
दरम्यान, या संदर्भात मालेगाव तालुका पॉवरलूम समितीचे अध्यक्ष हाजी युसूफ इलियास यांनी तांबाकाटा येथे यंत्रमागधारक सूत व कापड व्यापारी यांची बैठक घेत ६ ते १२ ऑक्टोंबर या सात दिवसात यंत्रमाग पुर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती दिली. शहरातील सर्व बारा यंत्रमागधारक संघटनांनी निर्माण झालेल्या परिस्थितीकडे पाहत यंत्रमाग उद्योग विशेषत: लहान यंत्रमाग धारकांना आर्थिक संकटातून वाचविण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट केले, प्रदुषणाच्या मुद्यावरून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून राजस्थानातील पाली, बालोत्रा व जोधपूर येथील कापडावर प्रक्रिया करणारे उद्योग बंद करण्याची कारवाई सुरू झाली आहे. जे प्रक्रिया उद्योग सुरू होते ते देखील पोलिसांतर्फे बंद केले जात असल्याने सुती कापडावरील प्रक्रिया जवळपास ठप्प झाली आहे. यामुळे प्रक्रिया होत नसल्याने कापडाचे भाव देखील मोठ्या प्रमाणात घसरत असून मीटरमागे एक ते दिड रूपयांचे नुकसान यंत्रमागधारकांचे होवू लागले आहे. यामध्ये २४ यंत्रमाग असलेल्या कारखानदारास आठवड्यातून २५ ते ३० हजाराबा आर्थिक फटका बसू लागला असल्याने यंत्रमागधारक अक्षरशः हवालदिल झाले आहेत.
गत पाच ते सहा महिन्यापासून हे संकट यंत्रमाग धारकांवर उभे ठाकले आहे. दोन ते तीन दिवस यंत्रमाग सुरू ठेवत कामगारांना दिलासा देण्याचा प्रयत्न यंत्रमाग धारकांतर्फे केला जात होता. मात्र सुताचे वाढलेले दर व कापडास मिळत असलेला कमी भाव बामुळे कारखानदारांचे अर्थकारण पुर्णतः विस्कळीत झाले आहे. अशीच परिस्थिती पुढेही राहिल्यास कारखानदार कर्जबाजारी होवून यंत्रमाग बंद पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीकडे केंद्र व राज्य शासनाचे लक्ष वेधत या समस्येतून मार्ग काढावा यासाठी शहरात सात दिवस संपूर्ण यंत्रमाग बंद ठेवण्याचा निर्णय १२ यंत्रमाग धारक संघटनांतर्फे बैठक घेत घेण्यात आला आहे.
सुताचे भाव वाढत असल्याने केंद्र सरकारने बांगलादेशात केली जात असलेली सुताची निर्यात थांबवावी व देशातील यंत्रमाग धारकांना स्वस्त दरात सुत उपलब्ध करून द्यावे याबरोबरच कापडावर प्रक्रि या करणारे राजस्थानातील उद्योग नियमानुसार सुरू करण्यासाठी तातडीने पाऊले उचलावीत व यंत्रमाग उद्योगासंदर्भात सद्यस्थितीत असलेले धोरण केंद्र सरकारने तातडीने बदलावे या मागणीची त्वरेने पुर्तता झाल्यास यंत्रमाग उद्योगास दिलासा मिळू शकणार आहे. यासाठी या बंद काळात महाराष्ट्र व राजस्थान राज्यातील मुख्यमंत्री, उद्योगमंत्री तसेच केंद्रीय टेक्सटाईल मंत्री गिरीराज सिंग, शिक्षणमंत्री दादा भुसे, नाशिक जिल्हाधिकारी यांच्यासह मालेगाव, धुळे, इचलकरंजी व भिवंडी येथील आमदार तसेच यंत्रमागधारक संघटनांना देखील निवेदने देत यंत्रमाग उद्योगावर आलेल्या संकटाकडे लक्ष वेधण्याचा निर्णय येथील यंत्रमाग धारक संघटनांनी घेतला आहे.
राजस्थानातील कापडावर प्रक्रिया करणारे उद्योग बंद पडल्याने यंत्रमाग धारक ग त सहा तसहा महिन्यापासून आर्थिक मंदित सापडले आहेत. अशातच केंद्र सरकारतर्फे बांगलादेशला सुताची निर्यात जीएसटी कर न आकारता केली जात आहे. यामुळे सुताचे भाव वाढले आहेत तर मीटर मागे एक ते दिड रूपये कापडाला कमी भाव मिळत असल्याने यंत्रमाग धारकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने कापडाची निर्यात करावी. तसेच सहा महिन्याचे वीजबिल यंत्रमाग धारकांना माफ करावे व प्रक्रिया उद्योग सुरू करावेत या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी सात दिवस यंत्रमाग बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. – हाजी युसूफ इलियास, तालुका पॉवरलूम संघटना अध्यक्ष




