Wednesday, February 11, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNirmala Gavit : शंभर कोटींच्या भ्रष्टाचारप्रकरणी माजी आमदार गावितांना दिलासा; उच्च...

Nirmala Gavit : शंभर कोटींच्या भ्रष्टाचारप्रकरणी माजी आमदार गावितांना दिलासा; उच्च न्यायालयाने दाखल सर्व याचिका फेटाळल्या

घोटी | वार्ताहर | Ghoti

माजी आमदार निर्मला गावित (Former MLA Nirmala Gavit) यांच्याविरोधात उपसा जलसिंचन योजनेतील १०० कोटी रुपयांच्या भ्रष्टाचारप्रकरणी दाखल (Corruption Case) करण्यात आलेले सर्व याचिका मुंबई उच्च न्यायालयाकडून (Mumbai High Court) फेटाळण्यात आल्या आहेत. तब्बल सहा वर्षे नऊ महिने चाललेल्या न्यायालयीन लढाईनंतर सर्व निकाल माजी आमदार निर्मला गावित व माजी जिल्हा परिषद उपध्यक्ष नयना गावित यांच्या बाजूने लागले आहेत.

- Advertisement -

माजी सभापती गोपाळ दगडू लहांगे यांनी मार्च २०१९ पासून विविध न्यायालये व प्राधिकरणांकडे माजी आमदार निर्मला गावित व संबंधित संस्थांविरोधात उपसा जलसिंचन कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत तक्रारी व अर्ज दाखल केले होते. मात्र, या सर्व प्रकरणांची सखोल सुनावणी झाल्यानंतर आरोपांना कोणताही ठोस पुरावा नसल्याचे स्पष्ट होत सर्व अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत.

YouTube video player

माजी आमदार निर्मला गावित या रमेश गावित संस्थापक व चेअरमन तसेच माजी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष नयना गावित देखील व देब मोगरा आदिवासी सेवाभावी संस्था यांच्या माध्यमातून झालेल्या कामांचाबत आरोप करण्यात आले होते. तसेच, आमदारपदाचा (MLA) गैरवापर केल्याचा दावा तक्रार अर्जात करण्यात आला होता. मात्र न्यायालयीन निकालांमध्ये पदाचा कोणताही गैरवापर झाल्याचे सिद्ध होत नसल्याचे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित आरोप पूर्णतः बिनबुडाचे ठरले आहेत.

याशिवाय, माजी आमदार निर्मला गावित यांचे पती तथा तत्कालीन कार्यकारी अभियंता रमेश गावित (Ramesh Gavit) यांच्या मदतीने भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही करण्यात आला होता. मात्र या संदर्भातही कोणताही दोषारोप सिद्ध न झाल्याने सर्व आरोप न्यायालयांनी फेटाळून लावले आहेत. तसेच नाशिक जिल्हा न्यायालय, इगतपुरी न्यायालय तसेच धर्मादाय आयुक्त, नाशिक विभाग यांच्याकडील चौकशी अर्जक्र. ०३/२०१९ हाही दि. ४ फेब्रुवारी २०२६ रोजी फेटाळण्यात आला होता.

न्यायावर माझा कायम विश्वास

सत्य आणि न्यायावर माझा कायम विश्वास राहिला असून, आज न्यायालयीन व प्रशासकीय स्तरावरून मिळालेल्या निर्णयांमुळे तो विश्वास अधिक दृढझाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर राजकीय द्वेषातून खोटे, निराधार व बदनामीकारक आरोप करण्यात आले. मात्र मुंबई उच न्यायालय, नाशिक जिल्हा न्यायालय, इगतपुरी न्यायालय तसेच धर्मादाय आयुक्त यांनी दिलेल्या निकालांमुळे हे सर्व आरोप पूर्णतः बोगस असल्याचे सिद्ध झाले आहे.

निर्मला गावित, माजी आमदार इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघ

ताज्या बातम्या

रोहित

CM Devendra Fadnavis: ‘अपघात की घातपात?’ रोहित पवारांच्या शंकेवर मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर,...

0
मुंबई | Mumbaiराज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा भीषण विमान अपघातात मृत्यू झाला. अजितदादांच्या अकाली निधनाने अख्खा देश हळहळला. पण, अजित पवारांच्या निधनानंतर असंख्य...