Tuesday, November 24, 2026
HomeनाशिकNashik News : गुन्हे तपासात 'ड्रोन फॉरेन्सिक्स'चा अध्याय; सेंटर ऑफ एक्सलन्सद्वारे हायटेक...

Nashik News : गुन्हे तपासात ‘ड्रोन फॉरेन्सिक्स’चा अध्याय; सेंटर ऑफ एक्सलन्सद्वारे हायटेक गुन्ह्यांचा पर्दाफाश होणार

नाशिक | भारत पगारे | Nashik

आकाशात उडणाऱ्या ड्रोनचा (Drone) वापर आता केवळ चित्रीकरण किंवा सर्वेक्षणापुरता मर्यादित राहिला नसून, बेकायदेशीर टेहळणी, तस्करी, घुसखोरी आणि गुन्हेगारी कृत्यांसाठीही केला जात आहे. या आव्हानाला तोंड देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या (Maharashtra Government) फॉरेन्सिक सायन्स प्रयोगशाळा संचालनालयाने (डीएफएसएल) डिजिटल फॉरेन्सिक क्षेत्रात पाऊल टाकले आहे. स्टेट फॉरेन्सिक प्रयोगशाळेत उभारण्यात आलेल्या विशेष सेंटर ऑफ एक्सलन्सच्या (Centre of Excellence) माध्यमातून आता ड्रोन फॉरेन्सिक्सवर भर दिला जाणार आहे.

- Advertisement -

या यंत्रणेमुळे गुन्ह्यात (Crime) वापरलेल्या ड्रोनमधील फ्लाइट लॉग्स (उड्डाणाची माहिती), जीपीएस लोकेशन, कॅमेऱ्यातील फूटेज आणि डिव्हाइस डेटा अचूकपणे बाहेर काढून न्यायालयात सिद्ध करता येणारा डिजिटल पुरावा तयार करणे शक्य होणार आहे. गुन्हेगारी जगतात वाढत्या तंत्रज्ञानाच्या (Technology) वापरामुळे पारंपरिक तपासाच्या सीमा संपल्या आहेत. ड्रोनद्वारे केली जाणारी टेहळणी असो वा अमली पदार्थांची तस्करी, या तपासात मोठे आव्हान उड्डाण डेटा रिकव्हर करण्याचे असते.

ड्रोन कुठून उडाला, कोणत्या मार्गाने गेला आणि त्याचा पायलट कुठे बसला होता, याचा संपूर्ण डिजिटल नकाशा डीएफ एसलचे तज्ज्ञ तयार करतील. नष्ट झालेल्या किंवा अपघातग्रस्त ड्रोनच्या मेमरी चिपमधूनही डेटा सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे तंत्रज्ञान या केंद्रात आहे. एखाद्या गुन्ह्याच्या ठिकाणाहून गोळा केलेल्या डिजिटल पुराव्यांची साखळी सुरक्षित ठेवून, रॅपिड ट्रायज पद्धतीद्वारे अहवाल तयार केला जाईल. यामुळे न्यायालयात टिकणारा आणि ठोस पुरावा पोलिसांच्या (Police) हाती लागणार असून, प्रलंबित प्रकरणांचा जलद निपटारा होण्यास मदत होणार आहे.

स्मार्ट वाहने आणि आयओटी

आजकालच्या स्मार्ट वाहनांमध्ये आणि अंगावरील डिजिटल उपकरणांमध्ये गुन्ह्यांशी संबंधित महत्त्वाचे पुरावे दडलेले असतात. अपघात किंवा अपघाताचा बनाव रचून केलेल्या गुन्ह्यांचा उलगडा करण्यासाठी व्हेईकल फॉरेन्सिक्सचा वापर केला जाईल.

डीपफेक आणि व्हॉईस टेम्परिंग

एआय-आधारित ऑडिओ-व्हिडिओ पडताळणी तंत्रज्ञानामुळे बनावट व्हिडिओ, डीपफेक आणि बदललेले आवाज ओळखणे शक्य होणार आहे. ब्लॅकमेलिंग आणि सायबर गुन्ह्यांमध्ये हे अत्यंत प्रभावी ठरेल.

उपकरणांमधून डेटा रिकव्हरी

गुन्हेगार पुरावे नष्ट करण्यासाठी अनेकदा मोबाईल, हार्ड डिस्क किंवा मेमरी कार्ड तोडतात किंवा जाळतात. अशा अंशतः किंवा पूर्णपणे उद्ध्वस्त उपकरणांमधून डेटा काढण्यासाठी क्लीन-रूम वर्कफ्लोची सुविधा तयार आहे.

क्रिप्टो आणि ब्लॉकचेन

आभासी चलने (क्रिप्टो) आणि डिजिटल फायनान्सच्या माध्यमातून होणाऱ्या आर्थिक फसवणुकीचे धागेदोरे शोधण्यासाठी ब्लॉकचेन ट्रेसिंग आणि डेटा कोरिलेशन तंत्रज्ञान वापरले जाणार आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : ऊसदरावर निर्णय न झाल्यास शनिवारी रेलरोको-रास्तारोको

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या ऊसाला राज्यातील अन्य जिल्ह्याप्रमाणे भाव मिळावा, या मागणीसाठी 26 तारखेला जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीत...