Wednesday, April 22, 2026
Homeनाशिक४४ ग्रामपंचायतीसाठी आज मतदान

४४ ग्रामपंचायतीसाठी आज मतदान

नाशिक । प्रतिनिधी

जिल्ह्यातील ४४ ग्रामपंचायतीसाठी रविवारी (दि.८) सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार आहे. सोमवारी (दि.९) मतमोजणी होऊन विजयाचा गुलाला उधळला जाईल. दरम्यान, चार ग्राम पंचायतीसाठी बिनविरोध निवडणूक झाली आहे.

- Advertisement -

देवळा व दिडोरी प्रत्येकी एक, कळवण ४, येवला २, नांदगाव ६, मालेगाव ३, निफाड दहा, बागलाण १७ अशा एकूण ४४ ग्रामपंचायतीसाठी आज मतदान होणार आहे.

सरपंचपदासह १८८ सदस्या निवडले जातील. यापुर्वी उमेदवारी अर्ज माघारीमुळे ४ ग्रामपंचायत व २०१ सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. जिल्हा प्रशासनाकडून मतदानाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, यासाठी दक्षता बाळगण्यात आली आहे.

तसेच, यावेळी दहा ग्रामपंचायतीसाठी पोटनिवडणूक होणार आहे. कळवणमधील खिराड, मालेगावमधील निमगाव, कळवाडी, दिंडेरीत वनारवाडी, नाशिकमध्ये वासाळी, इगतपुरीत वाळविहार, आळवड, आहुली, त्र्यंबकमकध्ये सापगाव व चांदवडमध्ये कळमदरे या ग्रामपंचायतीसाठी पोटनिवडणूक होणार आहे.

ताज्या बातम्या

सरकारी कर्मचारी-शिक्षकांचा संप सुरूच

0
मुंबई / प्रतिनिधी Mumbai राज्य सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सुरू असलेला बेमुदत संप सुरूच राहणार असल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. सरकारी-निमसरकारी,शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय...