देवळाली कॅम्प । वार्ताहर
आरोग्यदायी शहर म्हणून ओळख असलेल्या देवळालीत वास्तव्यासाठी नागरिक प्राधान्य देतात. क्रीडानगरी असा शहराचा नावलौकिक असल्याने येथील आनंदरोड मैदानावर केंद्र शासनाच्या माध्यमातून ९.२५ कोटी रुपये खर्चाच्या क्रीडा संकुलास मान्यता मिळाली असून लवकरच त्याचे काम सुरू होणार असल्याचे खा. हेमंत गोडसे यांनी सांगितले.
येथील आनंद रोड मैदानावर कॅन्टोन्मेंट बोर्डाने ६० लाख रुपये खर्चाच्या अत्याधुनिक जॉगिंग ट्रॅकचा लोकार्पण खा. गोडसे यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. आ. सरोज अहिरे यांनी देवळाली मतदारसंघाचे देवळाली कॅम्प हे केंद्रबिंदू असून त्याच्या विकासासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून आपण सर्वतोपरी मदत करणार असल्याचे सांगितले.
याप्रसंगी उपाध्यक्ष भगवान कटारिया, नगरसेवक बाबुराव मोजाड, दिनकर आढाव, सचिन ठाकरे, प्रभावती धिवरे, आशा गोडसे, मीना करंजकर, सीईओ अजय कुमार, माजी उपाध्यक्ष बळवंत गोडसे, बसंत गुरुनानी, दिनकर पाळदे, सुनंदा कदम, तानाजी करंजकर, विश्वनाथ काळे, टोनी जेम्स, प्राचार्य डॉ. विजय मेधणे, वपोनि देवीदास वांजळे, सतीश मेवानी, अरुण जाधव, भाऊसाहेब धिवरे, चंद्रकांत गोडसे, मेजर विनल साळवी, अॅड.बाळासाहेब आडके आदी उपस्थित होते.
प्रारंभी कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. यावेळी नगरसेविका धिवरे यांनी वॉर्ड १ मध्ये मोडणार्या आनंदरोड मैदानाचा चेहरामोहरा बदलला असून आरोग्यदायी देवळालीची संकल्पना पूर्ण होत आहे. ठाकरे यांनी दहा वर्षांच्या प्रयत्नाला आता मूर्त स्वरूप आले असून क्रीडाप्रेमींनी या जॉगिंग ट्रॅकचा वापर व संगोपन करण्याचे आवाहन केले.
मोजाड यांनी खा. गोडसे यांच्या माध्यमातून देवळालीच्या विकासाला गती मिळाल्याचे सांगितले. सूत्रसंचालन सायमन भंडारे तर आभार सीईओ अजय कुमार यांनी मानले. कार्यक्रमास महादेव तळेकरी, संजय गोडसे, दत्ता सुजगुरे, संजय भालेराव, नागेश देवाडिगा, विलास धुर्जड, बाळासाहेब गोडसे, पोपटराव जाधव, आर. डी. जाधव, सुशील चव्हाण, नितीन गायकवाड, विलास संगमनेरे, शिनू जोस, झिनाश खान, पंडित साळवे, बबन कांडेकर, विलास जाधव, अरुण निकम आदींसह आण्णाज टेंपल ग्रुप व मास्टर स्पोर्टस् क्लबचे सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देवळाली शहर देशात सर्वाधिक सुंदर असून येथील विकासासाठी सर्व घटक प्रयत्नशील आहेत. लवकरच भूमिगत गटार योजना, डायलेसिस सुविधा, अद्ययावत स्मशानभूमी घाटाचे लोकार्पण होणार आहे.
अजय कुमार, सीईओ