Friday, May 3, 2024
Homeनाशिक‘करोना’ च्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क; जिल्हाधिकार्‍यांच्या आरोग्य यंत्रणेला सूचना

‘करोना’ च्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क; जिल्हाधिकार्‍यांच्या आरोग्य यंत्रणेला सूचना

नाशिक । प्रतिनिधी

चीनमध्ये हुबेई प्रांतातील कहान शहरात ‘करोना’ हा विषाणूचे रुग्ण आढळले असून तो जगभर पसरण्याची शक्यता आहे. चीनमध्ये आतापर्यंत ४१ जणांना त्याची लागण झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनानेही सर्व जिल्ह्यांतील आरोग्य यंत्रणांना मागर्दशक सूचना दिल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून वैद्यकिय ंंयंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी पत्रक प्रसिध्द करुन जिल्हा आरोग्य यंत्रणेला सूचना दिल्या आहेत. इन्फल्यूएंजा सदृश्य रुग्ण आणि श्वसनसंस्थेच्या तीव्र प्रादुर्भाव या आजारांचे सर्वेक्षण सर्व आरोग्य संस्थांनी करणे आवश्यक आहे . प्रत्येक जिल्ह्यासह महापालिकेने कार्यक्षेत्रातील खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना माहिती द्यावी. जिल्हास्तरावर या संदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक हे जिल्हा नोडल अधिकारी म्हणून काम पाहतील.

पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञानसंस्था येथे प्रयोगशाळा निदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या तरी विषाणूचा प्रादुर्भाव राज्यात होण्याची शक्यता कमी दिसते तथापी, इन्फुल्यूएंजा सदृश आजाराच्या तसेच श्वसन संस्थेच्या तीव्र आजाराच्या रुग्णांनी व नातेवाईकांनी घ्यावयाच्या काळजीबाबत जनतेचे प्रबोधन करावे. स्वाईन फ्ल्यू संदर्भात उपलब्ध आरोग्य शिक्षणविषयक साहित्याचा वापर करावा .

जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेच्या सर्व प्रमुखांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील सर्वेक्षण अधिक कार्यक्षम करून नव्याने उद्भवलेल्या या दोन विषाणूंचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य व्यवस्था अधिक सदृढ करण्यासाठी योग्य ते प्रयत्न करावेत ,असे आदेश आरोग्य सचिवांमार्फत देण्यात आले असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले आहे.

लक्षणे : पाच वर्षांवरील वयोगट
अचानक येणारा ताप व खोकला, घसा बसणे, दम लागणे, श्वास घ्यायला त्रास होणे, अतिसार – काहीरुग्णांमध्ये मूत्रपिंड निकामी होणे, प्रतिकार शक्तीची कमतरता असलेल्यांना ही असामान्य लक्षणे आढळू शकतात. न्यूमोनियाची लक्षणे दिसल्या तत्काळ तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या