नाशिक । प्रतिनिधी
महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना -२०२० ची ऊर्वरीत अमंलबजावणी करणे आणि खरीप हगांमासाठी नवीन पीककर्ज वाटप करण्याची कार्यवाही त्वरीत सुरू करावी,अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र सपंर्क प्रमुख दत्तु बोडके यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना -२०२० ची दोन लाखाच्या आतील शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर झाल्यानतंर पहिली यादी जाहीर झाली.परंतु , नंतर करोना विषाणू सकंटामुळे कर्जमाफीची ऊर्वरीत अमंलबजावणी थांबलेली असुन पुढील कर्जमाफी योजनेची अमंलबजावणी त्वरित करण्यात यावी,
तसेच पुढील खरीप हगांम लवकरच सुरु होणार असून शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज मिळावे,यासाठी प्रशासनाने योग्य दखल घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा,अशी मागणीही दत्तु बोडके यांनी केली आहे.




