Friday, May 3, 2024
Homeनाशिकजिल्हा शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाची प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षणाधिकाऱ्यांशी चर्चा

जिल्हा शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाची प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षणाधिकाऱ्यांशी चर्चा

नाशिक l प्रतिनिधी

जिल्ह्यातील शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.वैशाली झनकर यांची भेट घेतली. यात विविध विषयांवर तोडगा काढत मुख्याध्यापकांची पदोन्नतीची प्रक्रिया ऑनलाईन करण्याचे निश्चित झाले आहे. तसेच या प्रकियेसाठी पात्र शिक्षकांना संबंधित तालुक्याची ठिकाणी उपस्थित रहावे, लागणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष काळूजी बोरसे यांनी सांगितले.

- Advertisement -

येत्या १५ तारखेला शाळा सुरु होणार असल्याचे पत्र गट शिक्षणाधिकार्‍यांनी मुख्याध्यापकांना दिले आहे. शाळा सुरू करायची असल्यास हमीपत्र भरुन देण्याची सक्ती केली आहे. या धर्तिवर शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने डॉ.झनकर यांची भेट घेऊन चर्चा केली. यात जिल्ह्यातील मुख्याध्यापकांची पदोन्नती रखडली आहे. त्यावर येत्या १५ दिवसांत ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन राबवण्यात येईल. पात्र शिक्षकांना संबंधित तालुक्याच्या ठिकाणी उपस्थित रहावे लागेल. पदोन्नतीच्या रिक्त जागांची अहवाल अगोदर प्रसिध्द केला जाईल. त्यानंतर ही प्रक्रिया राबवली जाणार आहे.

निवड श्रेणी प्रक्रिया एकाच वेळी राबवण्यात येणार असल्याचे आश्वासन शिक्षणाधिकारी डॉ.झनकर यांनी दिले. याप्रमुख विषयांसह विविध प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा केली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष काळूजी बोरसे पाटील, राज्य कोषाध्यक्ष केदूजी देशमाने, राज्य संघटक नंदू आव्हाड, सुनिल भामरे, जिल्हा सरचिटणीस प्रकाश सोनवणे, जिल्हा कोषाध्यक्ष साहेबराव पवार, जिल्हा प्रसिध्दीप्रमुख जगन्नाथ बिरारी व पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या