Friday, May 3, 2024
Homeनाशिकअनियमित वीज पुरवठ्यामुळे शेतकरी त्रस्त

अनियमित वीज पुरवठ्यामुळे शेतकरी त्रस्त

अभोणा । वार्ताहर

कळवण तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वीज पुरवठा सुरळीत नसल्याने शेतकर्‍यांनी नाराजी व्यक्त केली असुन त्वरीत वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

- Advertisement -

तालुक्यातील बोरदैवत, अंबिका ओझर, देवळीवणी, चिंचपाडा,खिराड, देसगाव, बेदिपाडा आणि परिसरातील गावांतील आदिवासी बांधव आता इतर जोडधंद्यांबरोबर शेतीकडे वळत आहे. यात प्रामुख्याने तरुण वर्गाचा मोठ्या प्रमाणात शेतीकडे कल दिसून येत आहे. त्यामुळे शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत असून चालू हंगामात कांदा पिकाची लागवड समाधानकारक झाली आहे. त्याचबरोबर बटाटा, स्टॅ्राबेरी, मिरची या फळपिकांची ही लागवड समाधानकारक झालेली आहे. त्यातच मार्च महिना चालू झाल्यामुळे उन्हाची तीव्रताही वाढत आहे.

कांदा पीकास पुरेसे पाणी देणे अत्यावश्यक आहे. कमी पाण्याचा प्रभाव उत्पादनावर पडू शकतो. त्यामुळे शेतकरी बांधवांकडून शेतीला पाणी देण्यासाठी लगभग सुरू आहे. मात्र शेतीसाठी महावितरणकडून करण्यात येणारा वीज पुरवठा सुरळीत नसून १ मार्च २०२० पासून या भागातील विजेचे वेळापत्रक बदलेले आहे. शेतीसाठी आठवड्यातुन ३ दिवस रात्री १२ वाजेच्या पुढे वीज पुरवठा होत आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित होणे, कमी दाबाने होणे महावितरणाने टाकलेल्या तारा खूप जीर्ण झाल्या आहे. जास्त प्रमाणात लोड आल्यामुळे तारा तुटून पडतात असा भारनियमनाचा अतिरेक झाला आहे.

शेतीला पाणीपुरवठा करणारे कृषीपंप आणि ट्रान्सफॉर्मर देखील नादुरुस्त होत आहे. यातून मोठे अपघात होण्याची भीती आहे. या वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या नेहमीच्या झाल्या आहे. त्यामुळे शेतकरी बांधव थंडी, ऊन, वारा, पाऊस, याची तमा न बाळगता रात्री अपरात्री शेतकर्‍यांना पिकाला पाणी देण्यासाठी शेतात जावे लागते आहे. महावितरण सक्तीचे वेळापत्रक लादून नेहमी अन्याय करते.कृषीपंपाला महावितरणच्या कारभारामुळे कमी दाबाचा विद्युत पुरवठा होत आहे.त्यामुळे शेतकर्‍याचे पंप, केबल जळणे, स्टार्टर खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. शेतकर्‍यांना कृषीपंपासाठी योग्य दाबाचा वीजपुरवठा अखंडितपणे द्यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

सरकार कडून शेतकरी वर्गाला देण्यात आलेल्या विविध सवलती जसे वीजबिल माफी, कर्जमाफी तसेच वाढती वीजचोरी, वीजटंचाई यावर शाश्वत उपाय म्हणून पारंपारिक पद्धतीने ऊर्जा साधनसामग्रीचा वापरावर देण्यात येणार्‍या सवलती बाजूला ठेवून सौरऊर्जा वापरावर अधिक भर दयावा, त्यावर विनाशर्त अनुदान देऊन शेतकरी बांधवानां प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.
भाऊसाहेब भोये, अंबिका , ओझर

- Advertisment -

ताज्या बातम्या