नाशिक । प्रतिनिधी
जगभर करोनाने घातलेले थैमाना मुळे जगावर आलेले संकट दुर होतांना दिसत नसतांनाच त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांनी कोविड १९ साठी केलेल्या मदतीच्या आव्हानाला प्रतिसाद देत पारले बिस्कीट प्रा,ली गोंदे दुमाला कँपनीच्या स्टाफ च्या वतीने ५५३६५ रुपये मुख्यमंत्री सहायता निधी साठी देण्यात आले.
- Advertisement -
इगतपुरी तालुक्यातील गोंदे अद्योगिक वसाहती मधील पारले बिस्कीट प्रा.ली कारखान्याच्या स्टाफ च्या वतीने कंपनीचे एच आर विभागाचे व्यवस्थापक एस.काजळें,व सागर डावरे यांनी इगतपुरीचे उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण यांच्याकडे देण्यात आले .त्याच बरोबर सामाजिक बांधिलकी जपत कंपनीच्या वतीने लॉक डाऊनच्या काळात कंपनीच्या वतीने ग्रामीण पोलिस कर्मचारी व आदिवासी वस्तीवर आणि गरीब गरजूंना बिस्किटचे व रेशन वाटप करण्यात आले.




