नाशिक। प्रतिनिधी
गुन्हे शाखेचे पोलीस असल्याची बतावणी करून दोन ठगांनी वृद्धाकडील सव्वा लाखाचे दागिणे लंपास केल्याचा प्रकार रविवारी (दि.३१) दुपारी राजीवनगर चौक परिसरात घडला.
- Advertisement -
या प्रकरणी अनंत जगन्नाथ कुडे (६०, रा. कानिफनाथ चौक, राजीवनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार रविवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास रस्त्याने पायी जात असताना राजीवनगर चौकात आम्ही गुन्हे शाखेचे पोलीस असून चोरीचे प्रकार वाढले असल्याने दागिणे काढुन खिशात ठेवा असे सांगत त्यांना त्यांच्या गळ्यातील ३ तोळ्याची चैन व अंगठी असे १ लाख २० हजार रूपयांचे दागिणे रूमालात ठेवून हातचलाखी करत हे दागिणे लंपास केले.
या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक जे, जी. शेख करत आहेत.




