नाशिक । प्रतिनिधी
लायन्स क्लब इंटरनॅशनल ही ॲार्गनायझेशन २०९ देशांमध्ये कार्यरत असुन १५ लाख सभासद आहेत.. व्हिजन, डायबेटीस, साईटफर्स्ट, एन्व्हार्यमेंट, चाईल्डहूड कॅन्सर हे पाच मुख्य उद्देश ठेवुन एकुण ४५००० क्लबच्या माध्यमांतुन लायन्स क्लब इंटरनॅशनल सेवाकार्य करते.लायन्स क्लब इंटरनॅशनलची डिस्ट्रीक्ट ३२३४ डी २ म्हणजेच नासिक जिल्हा, नगर जिल्हा, पुणे जिल्हा व पिंपरी चिंचवड विभाग कार्यक्षेत्रासाठी दरवर्षी प्रमाणे प्रांतपाल व उपप्रांतपाल पदाची निवडणुक इ-वोटींग पद्धतीने पार पडली..
यांत लायन्स क्लब ॲाफ नासिक राॅयल्सचे राजेश कोठावदे हे द्वितीय उपप्रांतपाल म्हणुन प्रंचंड मताधिक्याने निवडुन आले, एकुण मतदानाच्या ७० टक्के मते राजेश कोठावदेंना पडल्यामुळे त्यांच्या आजपर्यंतच्या समाजसेवी कार्याचा गोरवच झालेला दिसुन येतो२३ वर्षापासुन लायन्स क्लब मध्ये कार्यरत असलेले राजेश कोठावदे हे ५६ वर्षाच्या इतिहासात नासिक शहरातुंन तिसरे प्रांतपाल म्हणुन कार्यरत होतील.. नासिक जिल्याच्या द्रुष्टीकोनांतुन ही गौरवास्पद बाब आहे.
लायन्स क्लब इंटरनॅशनल फांउडेशन कडुन नासिक रिजन मध्ये गरजु प्रकल्पांसाठी हजारो डाॅलर्सची ग्रॅण्ट आजपर्यंत आलेली असुन यापुढेही नासिक रिजन मधील गरजुसांठी विवीध कायमस्वरुपी प्रकल्प क्लबच्या माध्यमांतुन पुढे येतील असं नवनिर्वाचीत उपप्रांतपाल ला राजेश कोठावदे यांनी बोलुन दाखविले.
त्यांच्या ह्या विजयांनतर आंतरराष्ट्रीय संचालक नवल मालु, PID नरेंद्र भंडारी, प्रांतपाल ओमप्रकाश पेठे, माजी प्रांतपाल राज मुछाल, गिरीष मालपाणी, मिलींद पोफळे, जितेंद्र मेहता, बि एल जोशी, जयंत दामले, सदानंद शेट्टी, DG (E) अभय शास्त्री , VDG1(E) हेमंत नाईक, कॅम्पेन कमिटी चेअरमन बापु निकुंभ, शेखर सोनवणे, मनिष अहिरे, राहुल वेढणे, आदिंनी अभिनंदन केले आहे.




