Thursday, May 2, 2024
Homeनाशिकपेठ : खंबाळे पाझर तलावात बुडून तीन मुलींचा मृत्यु

पेठ : खंबाळे पाझर तलावात बुडून तीन मुलींचा मृत्यु

पेठ । वार्ताहर

पेठ गावानजीकच्या खंबाळे पाझर तलावात दुपारी १२ वाजे दरम्यान  अंबापूर येथील ४ मुली कपडे धुण्यासाठी व आंघोळीसाठी गेल्या असता पाण्याचा अंदाज न आल्याने निशा पंढरीनाथ किलबिले वय ९ वर्ष , योगिता पंढरीनाथ किलबिले वय १२ वर्ष , पुनम संतोष बोके वय १३ वर्ष या तिघींचा पाण्यात बुडून मृत्यु झाला.

- Advertisement -

मात्र त्यांचे बरोबर गेलेली जागृती गोपाळ बोके ही ने आरडाओरड केली . मुलींना वाचविणे शक्य झाले नाही . मृतांपैकी निशा व योगीता या उभीधोंड येथील रहिवाशी असुन शाळा बंद असल्याने आपले आजोबा अंबापूर येथील नामदेव बोके यांचेकडे कालच आलेल्या होत्या. घटनास्थळी तहसीलदार संदीप भोसले , पोलीस निरीक्षक राधेश्याम गाडे पाटील यांनी भेट दिली. तिनही मृत बालीकेंचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले असून पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे , पुढील टापटास सपोऊनि जाडर अधिक तपास करीत आहेत .

- Advertisment -

ताज्या बातम्या