Friday, May 3, 2024
Homeनाशिक‘पीटी’च्या प्राध्यापकांसाठी अद्याप कार्यशाळा नाहीत; विद्यापीठाकडून दुजाभाव केल्याचा आरोप

‘पीटी’च्या प्राध्यापकांसाठी अद्याप कार्यशाळा नाहीत; विद्यापीठाकडून दुजाभाव केल्याचा आरोप

नाशिक । प्रतिनिधीे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाला शारीरिक शिक्षणफ विषय अनिवार्य केला असून, त्याला चार क्रेडिटदेखील दिले आहेत. मात्र, बदलेल्या अभ्यासक्रमाची माहिती प्राध्यापकांना व्हावी, यासाठी विद्यापीठाने प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले नाही. अशी माहिती प्राध्यापकांनी दिली आहे. त्यामुळे विद्यापीठाकडून कला, वाणिज्य आणि विज्ञान विद्याशाखेतील बदलेल्या अभ्यासक्रमांची माहिती प्राध्यापकांना होण्यासाठी प्रशिक्षण कार्यशाळा घेतल्या जात असताना शारीरिक शिक्षणाबाबत दुजाभाव का, असा प्रश्नही उपस्थित करण्यात येत आहे. विद्यापीठाने यंदापासून पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाला शारीरिक शिक्षण विषय अनिवार्य केला असून, तो क्रेडिट सिस्टीम पद्धतीद्वारे शिकवायचा आहे. प्रथम वर्षाच्या प्रथम सत्राला दोन; तर द्वितीय सत्राला दोन असे एकूण चार क्रेडिट पॉइंट्स देण्यात आले आहेत.

- Advertisement -

या विषयाची परीक्षा द्वितीय सत्रात घ्यायची आहे. क्रेडिट सिस्टीमसोबतच तो कसा राबवायचा, याबाबत विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील कॉलेजांमधील प्राध्यापकांमध्ये संभ्रम आहे.
विद्यापीठाने केवळ अभ्यासक्रम आणि मूल्यमापनाची माहिती देणारे परिपत्रक जाहीर केले आहे. मात्र, प्राध्यापकांची कार्यशाळा घेतलेली नाही. त्यामुळे प्राध्यापकांना मूल्यमापनाच्या प्रक्रियेची माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. कोणत्याही विद्याशाखेचा अभ्यासक्रम बदलला की, त्याची माहिती प्राध्यापकांना होण्यासाठी कार्यशाळा घेण्यात येते. यंदा विद्यापीठाने कला, वाणिज्य आणि सायन्स विद्याशाखेतील बदलेल्या अभ्यासक्रमांची माहिती प्राध्यापकांना होण्यासाठी प्रशिक्षण कार्यशाळा घेतली. राज्यातील इतर विद्यापीठेही अशाप्रकाराची कार्यशाळा घेतात. त्यामुळे विद्यापीठानेही ही प्रशिक्षण कार्यशाळा घ्यायला काय हरकत आहे, असा प्रश्न प्राध्यापकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

विद्यापीठाशी संलग्न असलेल्या कॉलेजांमध्ये शारीरिक शिक्षण विषय शिकवण्याबाबत प्राध्यापकांमध्ये अजूनही संभ्रम असल्याने विद्यापीठ प्रशासनाने तातडीने शारीरिक शिक्षण संचालक, प्राध्यापकांची प्रशिक्षण कार्यशाळा घ्यावी, अशी मागणी विद्यापीठ शारीरिक शिक्षण संघटनेने केली असून या विषयाबाबत प्राध्यापकांनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांना मागण्यांचे निवेदन दिले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या