Thursday, August 20, 2026
HomeनाशिकNashik Leopard News : शिवाजी चुंभळे यांच्या शेतात वावरणारा बिबट्या अखेर जेरबंद

Nashik Leopard News : शिवाजी चुंभळे यांच्या शेतात वावरणारा बिबट्या अखेर जेरबंद

नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik

कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंभळे (Shivaji Chumbhale) यांच्या पिंपळगाव खांब (Pimpalgaon Khamb) येथील शेतावर गेल्या कित्येक दिवसांपासून बिबट्याचा वावर सुरु होता. अखेर हा बिबट्या बुधवारी रात्री वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. पिंपळगाव खांब येथे काही दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात एक शेळी ठार झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी एका बंगल्याच्या आवारात चार बिबट्यांचा वावर असल्याचे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले होते.

- Advertisement -

त्यानंतर वनविभागाने (Forest Department) या भागात बिबट्याला (Leopard) जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला होता. गेल्या दोन महिन्यात या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झालेला नाही. त्यातच शनिवारी दि. ३१ मे रोजी दुपारी पुन्हा एकदा बिबट्याचा खुले वावर स्थानिक शेतकऱ्यांच्या निदर्शनास आला. चुंभळे यांच्या शेतावरील कुशल हरळ या मजुरावर शनिवारी दि. ३१ मे रोजी दुपारच्या वेळी बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र मजुराने प्रसंगावधान राखत तात्काळ घराकडे धाव घेतल्याने बिबट्या मक्याच्या शेतात पळून गेला.

दरम्यान, या बिबट्यामुळे दहशतीचे वातावरण पसरल्याने शेतीमधील (Farm) कामे करण्यासही अडचणी येत होत्या. त्यामुळे चुंभळे यांनी या ठिकाणी पिंजरा (Cage) लावण्याची वनविभागाकडे मागणी केली होती. त्यानुसार येथे पिंजरा लावण्यात आला होता. अखेर बुधवारी मध्यरात्री बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्याने येथील रहिवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला.

ताज्या बातम्या

Shirdi : अमेरिकेतील युद्धाच्या धोरणामुळेच डांबराची टंचाई

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धधोरणामुळे आणि पश्चिम आशियातील तणावामुळे डांबराची टंचाई निर्माण होऊन नगर-मनमाड महामार्गाचे काम संथगतीने सुरू असल्याच्या आपल्या...