Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Leopard News : देवळाली कॅम्प परिसरात बिबट्याचा मुक्तसंचार

Nashik Leopard News : देवळाली कॅम्प परिसरात बिबट्याचा मुक्तसंचार

नाशिक | Nashik

शहरातील भोसला मिलिटरी स्कूलमध्ये (Bhonsala Military School Area) आज (सोमवारी) बिबट्या (Leopard) शिरल्याचा दावा करण्यात आला होता. यानंतर वनविभाग व पाेलिसांनी (Police) राबविलेल्या शोध मोहिमेमध्ये बिबट्याचा वावर आढळलेला नाही. तरी दक्षता म्हणून वनविभागाचे पथक परिसरात गस्त करत असून, शंका असलेल्या ठिकाणी आठ ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत.तसेच रात्री देखील वनविभागाच्या वतीने थर्मल ड्रोन व इतर माध्यमातून शोध मोहीम तसेच गस्त करण्यात येणार आहे.

- Advertisement -

ही घटना ताजी असतानाच आज पहाटेच्या सुमारास नागरिकांना देवळाली कॅम्प येथील चर्चजवळ बिबट्या मुक्तसंचार करतांना दिसला आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चारचाकी वाहन चालकाने वाहन थांबवत बिबट्याचे छायाचित्र आपल्या मोबाईलमध्ये टिपले आहे. तसेच आज सकाळच्या सुमारास देखील बिबट्या एका भितींवर वावरतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यामुळे नाशिककरांवर ‘नाशिक जिल्हा बिबट्यांचा बालेकिल्ला’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.

YouTube video player

दरम्यान, वनविभागाने (Forest Department) नागरिकांना बिबट्याचा वावर आढळून आल्यास संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. तसेच संपूर्ण माहितीचे तथ्य तपासल्याशिवाय व खात्री केल्याशिवाय कोणत्याही चुकीच्या अफवा पसरवू नये, असे वनविभागाने म्हटले आहे. याशिवाय नागरिकांना काळजी घेण्यास देखील सांगण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

Prakash Londhe : रडायचं नाही लढायचं! तासाभरासाठी जेलमधून आलेल्या लोंढेंचा कुटुंबीयांना...

0
नाशिक | Nashik सातपूर (Satpur) येथील ऑरा बार प्रकरणासह खंडणीच्या विविध गुन्ह्यांमध्ये मोक्काच्या कारवाईमधील अटकेत असलेले आरपीआय जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे (Prakash Londhe) यांना काल (मंगळवारी)...